हे बनणार सारेगमप लिटिल चॅम्पसचे परीक्षक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2016 06:07 PM2016-12-14T18:07:10+5:302016-12-14T18:07:10+5:30
सारेगमप लिटिल चॅम्पसचे ऑडिशन सध्या धुमधडाक्यात सुरू आहे. यंदाचा लिटिल चॅम्पसचा सहावा सिझन आहे. भारताच्या विविध भागात ऑडिशनला खूपच ...
स रेगमप लिटिल चॅम्पसचे ऑडिशन सध्या धुमधडाक्यात सुरू आहे. यंदाचा लिटिल चॅम्पसचा सहावा सिझन आहे. भारताच्या विविध भागात ऑडिशनला खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या पर्वात अभिजीत भट्टाचार्य, अलका याज्ञिक आणि बप्पी लहरी यांनी परीक्षकाची भूमिका बजावली होती. गेल्या काही पर्वात हिमेश रेशमिया परीक्षकाच्या खुर्चीत प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता आणि यंदा पुन्हा एकदा हिमेश या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहे.
त्याला यावेळी नेहा कक्कर साथ देणार आहे. लडकी कर गयी चुल, काला चष्मा, लंडन ठुमकता यांसारख्या गाण्यांमुळे नेहा प्रसिद्धीझोतात आली.
हिमेश या कार्यक्रमाचे परीक्षण करण्यास खूप उत्सुक आहे. तो याविषयी सांगतो, "सारेगमपामध्ये आपल्याला नेहमीच खूप चांगले टायलेंट पाहायला मिळते. क्रिएटिव्ह टीम देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन सर्वोत्तम स्पर्धकांची निवड करत असते. या व्यासपीठाने आतापर्यंत खूप चांगले गायक इंडस्ट्रीला मिळवून दिले आहेत. यापुढेदेखील खूप चांगले गायक या कार्यक्रमामार्फत लोकांच्या समोर येतील असे मला वाटते."
नेहा कक्कर पहिल्यांदाच या कार्यक्रमाचा हिस्सा बनत आहे. या कार्यक्रमाविषयी ती सांगते, "एका रिअॅलिटी शोमधूनच माझ्या कारकिर्दीला सुरुवात झाली. मी एक स्पर्धक म्हणून रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती आणि आज मी इतक्या मोठ्या रिअॅलिटी शोची परीक्षक बनत आहे याचा मला अधिक आनंद होत आहे. मी स्वतः या कार्यक्रमाचे अनेक पर्व पाहिले आहेत. त्यामुळे काम करताना मला खूप मजा येईल. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना अधिकाधिक चांगले मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे."