महापालिका आणि परिवहनच्या कर्मचाऱ्यांना 14 हजार सानुग्रह अनुदान, कंत्रटी कामगारांनाही 10 हजार रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 05:25 PM2017-09-29T17:25:10+5:302017-09-29T17:25:32+5:30
ठाणे - मागील वर्षी प्रमाणो यंदा देखील कोणत्याही प्रकारचे आंदोलने न करता, महापालिका कर्मचा-यांच्या सानुग्रह अनुदानाचा मुद्दा पालिका प्रशासन आणि म्युनिसिपल लेबर युनियन यांच्यात झालेल्या वाटाघाटीच्या चर्चेनंतर पालिका आणि परिवहनच्या कामगारांना 14 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर कंत्रटी कामगारांना देखील 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. प्रशासनाचा हा निर्णय युनियनने देखील मान्य केला असल्याची माहिती युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी दिली आहे .
दोन महिन्यांपूर्वीच सानुग्रह अनुदानाची मागणी करूनही ठाणे महापालिकेच्या वतीने निर्णय घेण्यात आला नसल्याने पालिकेच्या कर्मचा-यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. कर्मचा:यांना दिवाळीपूर्वी 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावी अशी मागणी कर्मचा-यांनी केली होती. मात्र पालिका प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारे हालचाली झाल्या नव्हत्या. त्यामुळे पालिकेच्या विरोधात प्रखर आंदोलनाचा इशारा म्युनिसिपल लेबर युनियनने दिला होता. सानुग्रह अनुदानाबत शुक्रवारी सकाळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दालनामध्ये एक महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये पालिकेच्या आस्थापनेवर असणा-या कर्मचा-यांना आणि परिवहनच्या कर्मचा-यांना 14 हजार तर कंत्रटी कामगारांना एक वेतन देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ठाणो महापालिकेचे उत्पन्न 3 हजार कोटींच्या घरात असून, पालिकेचे महसूल वाढवण्यामध्ये कर्मचा:यांचा मोठा वाटा असल्याचा दावा युनियनने केला आहे. महापालिकेच्या एकूण बजेटच्या 69 टक्के महसुली उत्पन्न आहे. पूर्वी कर्मचा:यांच्या वेतनावर 59 टक्के खर्च होत होता, तोच खर्च आता बजेटच्या 20 टक्के आहे. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने कर्मचा-यांची संख्या देखील कमी असून त्यामुळे कर्मचा-यांवर कामाचा ताण देखील अधिक आहे. त्यामुळे यावेळी ज्यादा रकमेच्या बोनसची मागणी करण्यात आली होती. चौकट - पालिका कर्मचा:यांना आणि परिवहन कर्मचा:यांना एकाच वेळी सानुग्रह अनुदान मंजुर केले जाते. परंतु पालिका कर्मचा-यांना आधी आणि परिवहन कर्मचा-यांच्या बॅंक खात्यात तीन ते चार दिवस उशिराने सानुग्रह अनुदान जमा होते. परंतु तसे न करता एकाच दिवशी हे सानुग्रह अनुदान जमा व्हावे अशी मागणी परिवहनचे सभापती अनिल भोर यांनी महापौरांकडे एका पत्रद्वारे केली आहे.