ठाणे जिल्हाभर धावणाऱ्या बसवरील ३४२ जाहिराती - फलक एसटीने काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 07:33 PM2019-03-16T19:33:53+5:302019-03-16T19:38:27+5:30
जिल्ह्यातील आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आदेश जारी केले आहे. त्यास अनुसरून जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे पोस्टर, बॅनर्स, झेंडे, काढण्यात येत आहे. याप्रमाणेच जिल्ह्यासह राज्यभर एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाव्दारे बसेस सोडल्या जात आहेत. त्यावरील सरकारी जाहिरातील, राजकीय पक्षांचे दावे
ठाणे : आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे राजकीय पक्ष, सरकारी जाहिरातील, फलक, बॅनर, कटाऊट काढण्याची कारवाई जोरदारपणे सुरू आहे. यास अनुसरून एसटी महामंडळाच्या ठाणे विभागीय कार्यालयाने देखील त्यांच्या बसेसवरील व बस आगारातील आणि बस स्थानकातील सुमारे ३४२ जाहिराती, बॅनर्स, कटाऊट काढण्याची कारवाई केली आहे.
जिल्ह्यातील आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आदेश जारी केले आहे. त्यास अनुसरून जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे पोस्टर, बॅनर्स, झेंडे, काढण्यात येत आहे. याप्रमाणेच जिल्ह्यासह राज्यभर एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाव्दारे बसेस सोडल्या जात आहेत. त्यावरील सरकारी जाहिरातील, राजकीय पक्षांचे दावे, आश्वासने आदींच्या जाहिराती काढण्याची कारवाई करण्यात आल्याचे एसटीचे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी लोकमतला सांगितले. आता कोठेही राजकीय जाहिरातील, फलक नसल्याचा दावा चव्हाण यांच्याकडून करण्यात आला आहे.
एसटीच्या ठाणे विभागाच्या नियंत्रणात सुमारे ५०० बसेस धावतात, त्यावरील सर्व प्रकारच्या जाहिरातील त्वरीत काढून टाकण्याचे कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील ठाणे , वंदना, खोपट, कल्याण, विठ्ठलवाडी, मुरबाड, भिवंडी, शहापूर, आदींसह प्रमुख बस स्थानक आणि छोटेछोटे बस स्टॉपवर असलेले बॅनर्स, होल्डींग, कटाऊट काढण्यात आल्याचा दावाही चव्हाण यांनी केला. यामुळे लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी एसटीचे यंत्रणा जिल्हह्यात सक्रीय झाली