ठाण्यातील ३६१ व्या अभिनय कट्टयावर 'यंटम झाला...रसिकांच्या अलोट गर्दीत हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 04:51 PM2018-01-29T16:51:31+5:302018-01-29T17:01:21+5:30
३६१ क्रमांकाच्या अभिनय कट्टयावर रसिकांच्या अलोट गर्दीत हजेरी लावली ती म्हणजे यंटमच्या टीमने.
ठाणे : अभिनय कट्ट्यावर दीपप्रज्वलनचा मान मिळवला डोअरस्टेप आणि मुक्तांगण आणि एमएसडब्लूसी शी निगडीत विद्यार्थी कलाकारांनी. प्रार्थने नंतर डोअर स्टेप या संस्थेतील आणि महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थी-कलाकारांनी शून्य कि शक्ती हे स्कीट सादर करत शून्यच्या उत्पती पासून त्याचे महात्म्य प्रेक्षकांसमोर मांडले. रुचिरा पिंगुळकर दिग्दर्शित या स्कीट मध्ये आकाश, रोमिष, अनिता, अनिल, संजना, पूजा या कलाकारांनी आपली कला सादर केली. पुढे कट्ट्याच्या कलाकारांनी काही नृत्याभिनायाद्वारे रसिकांचे मनोरंजन केले. या मध्ये माधुरी कोळी यांनी जीवनातील घडी हि अशी, साक्षी महाडिक यांनी ये गलीया, तर नूतन लंके हिने ऊइमा ऊइमा ये क्या हो गया.. या गाण्यानांवर ताल धरला. शिल्पा लाडवंते हिने देश रंगीला द्वारे ऐक्याची भावना व्यक्त केली.
सादरीकरनानंतर वेळ होती ती यंटममय होण्याची कारण सिनेमाच्या संपूर्ण चमूने कट्ट्यावर हजेरी लावली होती. या मध्ये दिग्दर्शक रवी जाधव, निर्माते अमोल काळे , प्रस्तुत कर्ते दिग्द. रवी जाधव , संगीत दिग्द. महेश, ज्येष्ठ कलाकार सयाजी शिंदे यांसोबतच प्रमुख भूमिका करणारे सर्वच कलाकार मंडळी उपस्थित होती. यंटम च्या ह्या टीम समक्ष कट्ट्याच्या कलाकरांनी या चित्रपटाच्या गाण्यावर ताल धरला. सुरज परब व परेश दळवी दिग्दर्शित ‘यंटम झाला..’ या टायटल सॉंग वर कट्ट्याची कलाकार मंडळी तर थिरकलीच पण त्यासोबत रंग्या, रम्या आणि जेड्याने सुद्धा यंटम होऊन त्यांना सोबत दिली. पुढे चित्रपटाचा ट्रेलर कट्ट्याच्या कलाकारांनी सादरीकरणामधून मांडला.या मध्ये निलेश, शिवानी, प्रतीकेश, मयुरेश, संदीप, सहदेव, नवनाथ ,स्वप्नील, अतिश यांनी यंटम मधील विविध पात्रे रंगवली.कट्ट्याच्या उत्तरार्धात चित्रपटाच्याच्या टीम सोबत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खूद्द कट्ट्याचे अध्यक्ष दिग्दर्शक किरण नाकती यांनी मुलखातकर म्हणून उपस्थित होते. दिग्दर्शक समीर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना यंटम च्या प्रवास उलगडला. यंटम म्हणजे madness... हा अर्थ स्पष्ट करतानाच हि कलाकृती आकार घेत असतानाच त्याच्या चांगल्या निर्मिती साठी सर्वच मंडळी कशी यंटम झाली होती हे दिग्द. समीर पाटील यांनी स्पष्ट केले. तर संगीत दिग्दर्शक हि भूमिका यंटम सिनेमासाठी कशाप्रकारे वेगळी आणि महत्व पूर्ण होती हे स्पष्ट करताना महेशजींनी यंटम मधील सनई चा उल्लेख केला. सनई हे लग्न समारंभातलं, घरच्या अनेक शुभकार्यातल महत्वाची भूमिका बजावणार पण आता लोप पावत चाललेलं एक सुरेल वाद्य. आणि सिनेमातील हि सनई अगदी चित्रपटाच्या पोस्टर्स पासून सगळी कडे झळकतेय. त्यामुळे या सनई चा आणि यंटम चा नेमका काय संबंध आहे हे पाहायला २ फेब्रुवारीला चित्रपट गृहात गर्दी करण्याच आव्हान त्यांनी उपस्थित अलोट गर्दीला केले.
किरण नाकती यांनी रवी जाधव यांना प्रस्तुतकर्ता म्हणून हा सिनेमा स्वीकारण्यामागच कारण विचारल्यावर उत्तरादाखल त्यांनी सिनेमाचं कथानक उत्तम असल्याचे प्रतिपादन केले. त्या सोबतच मराठी चित्रपट सृष्टीला नव्याने मिळत असलेल्या कलाकार-दिग्दर्शक यांच्या पाठीशी कोणी तरी उभं राहायला हवं मग ती जबाबदारी मी का स्वीकारू नये असेही स्पष्ट केलेनिर्माते अमोल काळे यांनी सुद्धा उपस्थित रसिकांशी संवाद साधत रसिकांना सिनेमा पाहण्याचे आव्हान केले.सयाजी शिंदे यांनी रसिकांशि संवाद साधताना उपस्थित सर्वांचे आभार मानले. कट्ट्याच्या सर्व कलाकारांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्या कामगिरीत सातत्य राखा अस संदेश दिला आणि अभिनय कट्टा हि तुम्हा कलाकारांसाठी संजीवनी आहे असे नमूद केले. यंटम विषयी बोलताना त्यांनी उत्तम कलाकृतीला रसिकांनी नक्कीच दाद द्यायला हवी आणि त्यामुळे सर्वांनी सिनेमाचा आस्वाद घायावा असे स्पष्ट केले.
या सिनेमातील प्रमुख कलाकार म्हणजे वैभव कदम (रंगा), ऋषिकेश झगडे (जेड्या ), अक्षय थोरात (रम्या), अपूर्वा शेलगावकर(मिरा), ऐश्वर्या पाटील (कविता) यांनी सुद्धा आपला सिनेमाविषयी चा प्रवास मांडला. हे सर्वच नवीन चेहरे असून शुटींगच्या वेळेस केलेली धम्माल, सिनेमा करत असताना शिकायला मिळालेय अनेक नवीन गोष्टी या सगळ्यांची वाच्यता रसिकांसमोर केली. परिसंवादाअंती सिनेमात महत्व पूर्ण भूमिका बजावत असलेला अभिनय कट्ट्याचा कलाकार अक्षय थोरात याने अभिनय कट्ट्याचे आणि रसिकांचे आभार मानले. सदर कट्ट्याचे सूत्र संचालन संकेत देशपांडे यांनी पार पाडले होते.