बकरी ईदसाठी महापालिकेतर्फे ३८ कुर्बानी सेंटरची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:57 AM2017-09-01T00:57:49+5:302017-09-01T00:57:54+5:30
बकरी ईदसाठी महापालिकेतर्फे ३८ कुर्बानी सेंटरची सोय करण्यात आली आहे. गोवंश हत्या होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेशोत्सव व बकरी ईद एकत्र आल्याने पोलिसांनी संचलन केले.
भिवंडी : बकरी ईदसाठी महापालिकेतर्फे ३८ कुर्बानी सेंटरची सोय करण्यात आली आहे. गोवंश हत्या होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेशोत्सव व बकरी ईद एकत्र आल्याने पोलिसांनी संचलन केले.
तीन दिवस चालणाºया ईदसाठी ३८ कुर्बानी सेंटर बनवली आहेत. या सेंटरवर कुर्बानी देण्यासाठी आणलेल्या जनावरांची तपासणी करण्यासाठी पालिकेने ९० पशुवैद्यकीय अधिकाºयांची व ३० मदतनीसांची नेमणूक केली आहे.या कुर्बानीतून निघणारे ‘वेस्टमटेरीयल’ टाकण्यासाठी कारीवली रोड येथील स्लॅटर हाऊसच्या मागील जागेत १५ ते २० फूट खोल वीस खड्डे बनवले आहेत. तसेच स्वच्छतेच्यादृष्टीने पाण्याची सोय व जंतुनाशक औषधांची फवारणी केली आहे.
पोलिसांनी सात चेकपोस्ट बनवले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली. तसेच खाजगीरित्या कोणी कुर्बानी करून शहरात अस्वच्छता करेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
गणेशमूर्तींच्या विसर्जन मार्गावर एकूण ६८ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. या सणांसाठी शहरात १८ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ८७ सहायक पोलीस निरीक्षक, ६२० पोलीस कर्मचारी, ८० महिला पोलीस,१५० होमगार्ड, ६ राज्य राखीव दल आणि शीघ्र कृती दलाचे जवान तैनात केले आहेत.