सुमारे आठ लाख मतदार ओळखपत्राविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:22 AM2019-02-02T00:22:46+5:302019-02-02T00:23:15+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने गुरुवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली.

About eight lakh voters without a letter of introduction | सुमारे आठ लाख मतदार ओळखपत्राविना

सुमारे आठ लाख मतदार ओळखपत्राविना

Next

ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने गुरुवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार जिल्ह्यातील चार मतदारसंघांमध्ये ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार आहेत. यामध्ये ३३ लाख २१ हजार ७५८ पुरुष, तर २७ लाख ७० हजार ९४९ महिलांचा समावेश आहे. उर्वरित मतदारांमध्ये तृतीयपंथी ३४०, अनिवासी भारतीय ४०, तर सशस्त्र दलातील १२२१ मतदार आहेत. त्यापैकी सात लाख ६९ हजार ५५२ मतदारांकडे ओळखपत्रे नाहीत.

जिल्ह्यात ऐरोली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक चार लाख ३४ हजार ९३५ मतदार आहेत. याप्रमाणेच मीरा-भार्इंदरमध्ये चार लाख २२ हजार २७९, कल्याण पश्चिमला चार लाख २८ हजार ८१४, ओवळा-माजिवडा चार लाख २१ हजार ११८, कल्याण ग्रामीण चार लाख तीन हजार २०, मुरबाड तीन लाख ७८ हजार ५३०, बेलापूर तीन लाख ६८ हजार ५४३, मुंब्रा-कळवा तीन लाख २८ हजार ४५०, अंबरनाथ तीन लाख दोन हजार ५४६, कल्याण पूर्व तीन लाख ३३ हजार ९७१, डोंबिवली तीन लाख ३८ हजार २१७, कोपरी-पाचपाखाडी तीन लाख ४२ हजार ७९३, ठाणे तीन लाख १८ हजार ६७, भिवंडी दोन लाख ७९ हजार ३४०, शहापूर दोन लाख ४४ हजार ९०, भिवंडी पश्चिम दोन लाख ६४ हजार ६७८, भिवंडी पूर्व दोन लाख ६३ हजार ६७ तर उल्हासनगर विधानसभेत दोन लाख २१ हजार ८५० मतदार आहेत.

३४० तृतीयपंथींना मतदानाचा हक्क: जिल्ह्यातील ३४० तृतीयपंथींना मतदानाचा हक्क मिळाला आहे. यापैकी सर्वाधिक ८१ तृतीयपंथींची नोंदणी कल्याण पूर्व, भिवंडी पश्चिमला ७०, कल्याण ग्रामीण ५५, तर ऐरोलीला २५ तृतीयपंथी मतदारनोंदणी करण्यात आली आहे.

सर्वाधिक महिला मतदार कल्याण पश्चिममध्ये
सर्वाधिक दोन लाख एक हजार ७८१ महिला मतदार कल्याण पश्चिममध्ये नोंदवण्यात आल्या आहेत. मीरा-भार्इंदरला एक लाख ९६ हजार ६८४, ओवळा-माजिवडा मतदारसंघात एक लाख ९१ हजार ५७७, ऐरोलीत एक लाख ८५ हजार ८४१ महिला मतदार आहेत. सर्वात कमी महिला मतदार ९९ हजार ६८२ उल्हासनगर येथे आहेत.

6,488 मतदान केंद्रे
जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत सहा हजार ४८८ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. यापैकी मुरबाडमध्ये ४५६, ऐरोली ४३३, मीरा-भार्इंदर ४१६, कल्याण पश्चिम ४०९, ओवळा-माजिवडा ४०१, बेलापूर ३८६, मुंब्रा-कळवा ३५१, ठाणे ३७७, कोपरी ३६८, कल्याण ग्रामीण ३८९, डोंबिवली ३०३, कल्याण पूर्व ३४५, अंबरनाथ ३०३, भिवंडी पश्चिम ३११, शहापूर ३२६, भिवंडी ग्रामीण ३४९, भिवंडी पूर्व २८८, उल्हासनगर २७७ मतदान केंदे्र आहेत.

जिल्ह्यात नऊ लाख ४३ हजार ३१० युवा मतदार
जिल्ह्यातील युवा मतदारांनी नावनोंदणीस चांगला प्रतिसाद दिला आहे. यामध्ये १९ वयोगटातील ४३ हजार ७५८ मतदार आहेत, तर २९ वयोगटात आठ लाख ९९ हजार ३५२ मतदार आहेत. ३९ वर्षे वयोगटात १४ लाख ७१ हजार २७९, तर ४९ वयोगटात १५ लाख ६३ हजार २१०, तर ५९ वयोगटात १० लाख ८५ हजार ४२६, तसेच ६९ वयोगटापर्यंतचे सहा लाख १३ हजार ६२९ तसेच ७९ वयोगटापर्यंत दोन लाख ७३ हजार ६८३ आणि ८० वयोगटाच्या पुढील एक लाख ३२ हजार ७५० मतदार आहेत.

Web Title: About eight lakh voters without a letter of introduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.