झेंडे आणि पोस्टरवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:38 AM2017-12-08T00:38:15+5:302017-12-08T00:38:20+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आचारसंहितेचे काटेकारेपणे पालन व्हावे, यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी लावलेले विविध राजकीय पक्षांचे बॅनर
ठाणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आचारसंहितेचे काटेकारेपणे पालन व्हावे, यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी लावलेले विविध राजकीय पक्षांचे बॅनर, झेंडे व पोस्टर्स काढण्याची कारवाई निवडणूक आयोगाने केली आहे. यामध्ये ८१८ झेंडे, पोस्टर्स आतापर्यंत काढण्यात आले आहेत.
आचारसंहितेबाबत प्रचारादरम्यान सोशल मीडियाचा गैरवापर होत नाही ना, याकडे काटेकोर लक्ष ठेवावे तसेच पेड न्यूज समिती, भरारी पथकांनी, बँकांनी अधिक दक्ष राहून आचारसंहितेचा भंग होऊ नये, याची काळजी घेण्याच्या सूचना निवडणूक निरीक्षकांनी गुरुवारी दिल्या. नियोजन भवन येथे सकाळी आदर्श आचारसंहितेच्या व निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला. या वेळी उपस्थित असलेल्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची मतेदेखील जाणून घेण्यात आली.
या बैठकीत जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या कारवाईची माहिती देण्यात आली. यामध्ये ८१८ झेंडे, पोस्टर्स काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच पेड न्यूज प्रकारातून वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होणाºया बातम्या तसेच मजकूर तातडीने निवडणूक निर्णय अधिकाºयांनी पेड न्यूज समितीच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनीदेखील यावर लक्ष ठेवावे, भरारी पथकांनी अधिक दक्ष राहून कार्यवाही करावी, बँकांनी विशेषत: जिल्हा बँकांनी त्यांच्या खात्यात भरण्यात येणाºया मोठ्या रकमा किंवा मोठी रक्कम जर संशयास्पद वाटली, तर लगेच कळवावी, असेही या वेळी निरीक्षकांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार यांनीदेखील मार्गदर्शन केले. या वेळी सर्व निवडणूक निर्णय अधिकारीदेखील उपस्थित होते. जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्यांचे संपर्क क्र मांकदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.