कोपरी येथे आदिवासी मुलींच्या वसतीगृहाचा स्लॅब निखळला; मुलगी गंभीर जखमी- प्रशासनास थांगपत्ता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 05:45 PM2019-03-26T17:45:38+5:302019-03-26T17:50:26+5:30
गंभीररित्या जखमी झालेली विद्यार्थीनी एमएससीच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत असून तिचे नाव कांचन मोरे आहे. जव्हार तालुक्यातील चालतवड या गावातील कांचन ठाणे येथेबांदोडकर कॉलेजमध्ये एमएससीचे शिक्षण घेत आहे. या शैक्षणिक कालावधीत आदिवासी विभागाच्या वसतीगृहात ती वास्तव्याला आहे. मंगळवारी साडे बारा वाजेच्या सुमारास हा बाथरूमचा सॅबचा काही भाग निखळून पडला. दरम्यान मोरे हिच्या डोक्यावर काही तुकडे पडल्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली. रक्तबंबाळ अवस्थेत विद्यार्थिनींनी तिला सिव्हील रूग्णालयात त्वरीत दखल तिच्यावर उपचार केले.
ठाणे : येथील कोपरी येथे असलेल्या आदिवासी विकास विभागाच्य मुलींच्या वसतीगृहात स्लॅब निखळून एक विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली. या विद्यार्थीनिवर येथील सिव्हील रूग्णालयात उपचार करण्यात आले. तिच्या डोक्याला जबर मार लागला असून डोके फूटले आहे. त्यातून रक्त स्त्राव झाला असून त्यावर उपचार करून तिला रूग्णालयातून वसतीगृहात पाठवण्यात आले आहे. दुपारी घटना घडलेली असतानाही तिथे वसतीगृह अधिक्षकही उपस्थित नव्हते तर वाचमेन, कर्मचारी आदी कोणासही या दुर्घनेची कल्पना देखील नाही.
गंभीररित्या जखमी झालेली विद्यार्थीनी एमएससीच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत असून तिचे नाव कांचन मोरे आहे. जव्हार तालुक्यातील चालतवड या गावातील कांचन ठाणे येथेबांदोडकर कॉलेजमध्ये एमएससीचे शिक्षण घेत आहे. या शैक्षणिक कालावधीत आदिवासी विभागाच्या वसतीगृहात ती वास्तव्याला आहे. मंगळवारी साडे बारा वाजेच्या सुमारास हा बाथरूमचा सॅबचा काही भाग निखळून पडला. दरम्यान मोरे हिच्या डोक्यावर काही तुकडे पडल्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली. रक्तबंबाळ अवस्थेत विद्यार्थिनींनी तिला सिव्हील रूग्णालयात त्वरीत दखल तिच्यावर उपचार केले. वसतीगृहात व रूग्णालयात देखील अधिक्षक, कर्मचारी आदीपैकी एकही या कालावधीत विद्यार्थीनींसोबत नव्हता.
सुमारे ५० वर्ष जुन्या असलेल्या इमारतीमध्ये कोपरीत हे वसतीगृह कार्यरत आहे. जीर्ण झालेल्या या इमारतीच्या भिंतींना तडे गेले आहेत. सॅब जीर्ण झाल्यामुळे निखळून पडत आहे. सुमारे २०१५ लाख देखील या इमारतीचा स्लॅब पडल्याची घटना घडल्याचे सांगितले जात आहे. तरी देखील आदिवासी विभागाने तीन वर्षापासून या इमारतीत वसतीगृह सुरू केले आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर आदिवासी विकासविभागाचे हे मुलींचे वसतीगृह आहे. या इमारतीच्या वरच्या मजल्यावर ठाणे महानगरपालिकेची शाळा क्रमांक १६ भरते. या वसतीगृहात सुमारे ७४ विद्यार्थीनी वास्तव्यास आहे. मात्र त्यांच्यावर नियंत्रक असलेले अधिक्षक, वाचमेन, सिपाई आदी प्रशासकीय एकही कर्मचारी वसतीगृहाच्या कार्यालयात सायंकाळी ४ वाजेपर्यंतरीत एकही उपस्थित नव्हते. या संदर्भात अपर आयुक्त संजय मीना यांच्या निदर्शनात आणून देण्यात आली आहे. त्यांच्यावर सध्या निवडणुकीच्या कामाची जबाबदारी असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.
या वसतीगृहापासून काही अंतरावर असलेल्या वागळेइस्टेट येथील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात सायंकाळी सव्वाचार वाजेच्या दरम्यान संपर्क केला असता तेथे कोणीही उपस्थित नसल्याची गंभीरबाब उघकीस आली. त्यानंतर अपर आयुक्तांशी संपर्क साधण्यात आला. येथील प्रत्येक्ष चौकशी केल्यावर येथे अधिक्षक नसल्याचेही निदर्शनात आले. कर्मचारी देखील सायंकाळपर्यंत वसतीगृहात नसल्याची गंभीरबाब येथील विद्यार्थीनींशी चर्चा केली असता लक्षात आले. दुपारी रूग्णालया देखील एकही कर्मचारी, अधिक्षिक विद्यार्थीनींन सोबत नव्हता. अशी स्थिती असतानाही विभागीय कार्यालयाची जबाबदारी असलेले शेख यांनी वेळमारून नेण्यासाठी तेथे कर्मचारी उपस्थित असल्याची खोटी माहिती दिली. एवढेच नव्हे तर दुपारी विद्यार्थीनीला रूग्णालयात उपचारासाठी नेल्याचे दखील खोटी माहिती शेख यांनी देऊन प्रशासन सतर्क असल्याचे भासवले आहेत.
...............
फोटो - २६ ठाणे वसतीगृह सॅब