लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणा-यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:06 AM2017-09-09T03:06:56+5:302017-09-09T03:07:07+5:30
लग्नाचे आमिष दाखवून २७ वर्षीय तरुणीशी शारीरिक संबंध ठेवणाºया आरोपीस काशिमीरा पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करून अटक केली.
मीरा रोड : लग्नाचे आमिष दाखवून २७ वर्षीय तरुणीशी शारीरिक संबंध ठेवणाºया आरोपीस काशिमीरा पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करून अटक केली.
पीडित तरु णी काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. नागपाडा पोलीस ठाणे हद्दीत राहणाºया मोहम्मद खान याच्याशी तिची काही वर्षांपासून ओळख होती. मोहम्मदने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. शिवाय तिच्या घरातून ३ लाख रुपयेही नेले.
वारंवार सांगूनही लग्न करण्यास टाळाटाळ करणाºया मोहम्मदच्या नागपाडा येथील घरी अखेर ती तरुणी पोहोचली. प्रकरण नागपाडा पोलिसांत गेल्यावर तरु णीच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मोहम्मदवर गुन्हा दाखल करून तो काशिमीरा पोलीस ठाण्यात वर्ग केला.