मांडुळ सर्पाच्या तस्करीसाठी आलेल्या त्रिकुटाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 02:03 PM2018-03-23T14:03:17+5:302018-03-23T14:03:17+5:30
डोंबिवली: दुर्मिळ मांडुळ जातीचे सर्प औषधी पदार्थ व काळी जादुसाठी विक्री करण्यासाठी आलेल्या त्रिकुटाला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सापळा लावून अटक केली. कल्याण-शीळ मार्गावरील काटई नाका परिसरात ही कारवाई करण्यात आली. यात तस्करीसाठी वापरण्यात आलेले वाहन आणि दोन सर्प पोलिसांनी जप्त केले आहेत.

नवनाथ विश्वास दायगुडे, कृष्णा पारटे आणि प्रविण चव्हाण अशी अटक आरोपींची नावे आहेत हे सर्वजण पुणे आणि रायगड परिसरातील रहिवाशी आहेत. कल्याण-शीळ रोड काटई टोल नाका येथे काही व्यक्ती मांडुळ जातीचा वन्यसर्प विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहीती खब-यामार्फत गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरीष्ठ पोलिस निरिक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष शेवाळे, पोलिस हवालदार दत्ताराम भोसले, नरेश जोगमार्गे, विश्वास चव्हाण, पोलिस नाईक राजेंद्र खिलारे, सतिश पगारे, प्रकाश पाटील, राजेंद्र घोलप आणि हर्षल बंगारा आदिंच्या पथकाने परिसरात सापळा लावला होता. या पथकात वनरक्षक संतोष पालांडे हे देखील सहभागी झाले होते. खब-यामार्फत मिळालेल्या माहीतीनुसार आलेली स्कॉर्पिओ गाडी पथकाकडून अडविण्यात आली. गाडीची तपासणी केली असता त्यात प्लॅस्टिक गोणीत असलेले २ मांडुळ जातीचे सर्प आढळुन आले. वन अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार हे सर्प सुरक्षित ठेवून त्यानंतर त्याची देखभाल करण्यासाठी सर्पमित्र वैभव कुलकर्णी यांच्या निसर्ग विज्ञान संस्थेकडे सुपुर्द करण्यात आल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरिक्षक शेवाळे यांनी दिली. या सर्पांची किंमत सुमारे २५ लाख रूपये असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांना अधिक भाव असल्याचेही त्यांनी सांगितले. अटक करण्यात आलेले आरोपी हे सर्प कोणाला विक्री करण्यासाठी आले होते याचा तपास सुरू असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.