बंदुकीच्या धाकाने लुटीचा प्रयत्न फसला, डोंबिवलीत ज्वेलर्समधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:47 AM2017-10-25T01:47:07+5:302017-10-25T01:47:10+5:30

डोंबिवली : शहरात दिवसाढवळ्या घरफोड्या आणि सोनसाखळी चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. त्यातच सोने-चांदीचे दागिने विक्रीचा धंदा करणा-या सुरेश आणि अमित जैन या सराफा पिता-पुत्राच्या धाडसामुळे ज्वेलर्समध्ये घुसून गावठी कट्ट्याच्या धाकाने चोरी करण्याचा दोघा चोरट्यांचा प्रयत्न असफल ठरला.

The attempt of robbery with the bullet was in vain, the incident in Dombivali Jewelers | बंदुकीच्या धाकाने लुटीचा प्रयत्न फसला, डोंबिवलीत ज्वेलर्समधील घटना

बंदुकीच्या धाकाने लुटीचा प्रयत्न फसला, डोंबिवलीत ज्वेलर्समधील घटना

googlenewsNext

डोंबिवली : शहरात दिवसाढवळ्या घरफोड्या आणि सोनसाखळी चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. त्यातच सोने-चांदीचे दागिने विक्रीचा धंदा करणा-या सुरेश आणि अमित जैन या सराफा पिता-पुत्राच्या धाडसामुळे ज्वेलर्समध्ये घुसून गावठी कट्ट्याच्या धाकाने चोरी करण्याचा दोघा चोरट्यांचा प्रयत्न असफल ठरला. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
पश्चिमेतील सम्राट चौक परिसरात राहणाºया सुरेश जैन यांचे नजीक असलेल्या ठाकूरवाडीकडे जाणाºया रोडलगत प्रगती ज्वेलर्स आहे. सोमवारी ते नेहमीप्रमाणे मुलगा अमित सह दुकानात असताना दुपारी ४ च्या सुमारास दोन तरुण दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने आले. ‘मला तीन ते चार ग्रॅमची सोन्यची चेन दाखवा,’ असे यातील एकाने जैन यांना सांगितले. काही वेळाने सोन्याच्या चेन असलेला पूर्ण बॉक्स दाखवा, असेही सांगण्यात आले. बॉक्स दाखवण्याच्या तयारीत असताना एकाने त्याने कमरेत खोचलेला गावठी कट्टा काढला आणि त्याचा धाक दाखवित दुकानाचे शटर बंद करण्यास सांगितले. या वेळी अमित जैन हे पोलिसांना मोबाइलवरून फोन लावत असताना त्यालाही चाकूच्या धाकाने दमदाटी करण्यात आली. अमितकडे मोबाइलची मागणी करण्यात आली परंतु त्याने मोबाइल न देता खाली ठेवून दिला.
दरम्यान, दोघेही चोरटे जेव्हा चेन असलेला बॉक्स हिसकावण्याच्या प्रयत्नात असताना त्या वेळी अमितने त्यांना मारायला खुर्ची उचलली असता दोघांनी दुकानाबाहेर धुम ठोकली. जैन पिता-पुत्राने चोर-चोर, असा आरडाओरडा केल्यावर नागरिकांनी धाव घेतली. त्यात दोघेही चोरटे त्यांच्यासोबत आणलेली मोटारसायकल तिथेच टाकून ठाकूरवाडीकडे जाणाºया रोडने पळून गेले. त्या गाडीवर मागे-पुढे कुठेही नंबर प्लेट नाही.
>घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
प्रगती ज्वेलर्समधील घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. यावरून चोरट्यांचे छायाचित्र पोलिसांना मिळाले आहे. विष्णूनगर पोलीस व कल्याण गुन्हे शाखाही या घटनेचा समांतर तपास करत आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.

Web Title: The attempt of robbery with the bullet was in vain, the incident in Dombivali Jewelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.