साहित्य ते ज्योतिषशास्त्र अशा सर्वच क्षेत्रात बाबूजींनी ठसा उमटविला- मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 07:42 PM2017-12-03T19:42:33+5:302017-12-03T20:48:16+5:30

जेष्ठ लेखक बाबूराव मारुतीराव सरनाईक अर्थात बाबूजी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानिमित्त त्यांना सर्वपक्षिय नेत्यांनी ठाण्याच्या वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या सभागृहात रविवारी श्रद्धांजली वाहिली.

 Babuji impressed in all the fields of literature to astrology- Chief Minister | साहित्य ते ज्योतिषशास्त्र अशा सर्वच क्षेत्रात बाबूजींनी ठसा उमटविला- मुख्यमंत्री

साहित्य ते ज्योतिषशास्त्र अशा सर्वच क्षेत्रात बाबूजींनी ठसा उमटविला- मुख्यमंत्री

googlenewsNext
ठळक मुद्दे सर्वपक्षिय नेत्यांनी वाहिली बाबूराव सरनाईक यांना श्रद्धांजलीलढवय्या व्यक्तिमत्व म्हणून बाबूजींची ओळख उपेंद्र भट यांनी वाहिली संगीतपर श्रद्धांजली

ठाणे: साहित्य, पत्रकारिता ते ज्योतिषशास्त्र अशा सर्व क्षेत्रात कै. बाबुराव अर्थात बाबूजी सरनाईक यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला होता. पत्रकारितेतील सफर, आयुष्यातला संघर्ष आणि आचार्य अत्रेंचे किस्से ऐकावे ते बाबुजींकडूनच अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबूजींना आदरांजली वाहिली.
संयुक्त महाराष्ट्र लढयातील नेते, प्रख्यात पत्रकार ‘मराठा’ कार आचार्य अत्रे यांच्या पत्रकारितेतील एक साक्षीदार आणि साथीदार पत्रकार, लेखक तसेच आमदार प्रताप सरनाईक यांचे वडील बाबुराव अर्थात ‘बाबूजी’ यांचे ३० नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. त्यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम रेमंड कंपनीच्या सभागृहात रविवारी आयोजित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाबूजींच्या आचार्य अत्रे यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, सर्वच क्षेत्रात बाबूजींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला होता. प्रतिकूल परिस्थितीत त्याग, संघर्ष आणि कष्ट करून आपल्या संसाराचा गाडा हाकला. संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास तोंडपाठ असलेले बाबूजी हे नव्या पिढीसाठी आणि पत्रकारितेतील विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक होते, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक तसेच जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी स्वातत्र्य लढा ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा जवळून अनुभवणारे आणि या लढयाचे साक्षीदार असलेले एक लढवय्या व्यक्तिमत्व म्हणुन बाबुराव सरनाईक यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे आचार्य अत्रेंचा एक साक्षीदार हरपल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. तसेच प्राध्यापक, लेखक प्रदीप ढवळ यांनी बाबूजींच्या व्यक्तिगत जीवनातील आठवणींना उजाळा देऊन आपल्याला पुस्तक लिहितांना बाबुजींकडून मिळालेल्या अनुभवाचे कथन केले.
यावेळी महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजन विचारे, डॉ.श्रीकांत शिंदे, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, आमदार सुनील राऊत, रवींद्र फाटक, गणपत गायकवाड, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, नरेंद्र मेहता, जितेंद्र आव्हाड, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, मिरा भार्इंदरच्या महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती तसेच सर्व स्तरातील मान्यवर, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नगरसेवकांनी उपस्थित राहून बाबूजींना आदरांजली वाहिली. तसेच आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांचे त्यांनी सांत्वन केले. यादरम्यान भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांचे शिष्य उपेंद्र भट यांनी श्रद्धांजलीपर गीतांचा कार्यक्र म सादर केला.

Web Title:  Babuji impressed in all the fields of literature to astrology- Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.