अज्ञात वाहनाच्या धडकेत ठाण्यात बालिकेचा करूण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 18:25 IST2017-12-20T18:16:18+5:302017-12-20T18:25:22+5:30

भरधाव वाहनाच्या धडकेत ठाण्यातील बाळकूम भागातील बालिकेचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

baby died in Thane as unknown vehicle hit her | अज्ञात वाहनाच्या धडकेत ठाण्यात बालिकेचा करूण अंत

अज्ञात वाहनाच्या धडकेत ठाण्यात बालिकेचा करूण अंत

ठळक मुद्देचालक फरारगुन्हा दाखलसीसी कॅमेर्‍याचे फुटेज तपासणार

ठाणे : अज्ञात वाहनाच्या धडकेने एका पाच वर्षीय बालिकेचा मंगळवारी बाळकुम येथे करूण अंत झाला. परिसरातील सीसी कॅमेर्‍याचे फुटेज तपासून वाहनाचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.
बाळकुम येथील सर्व्हिस रोडला लागून असलेल्या शिवाजी नगरातील रहिवासी सुनील काशिनाथ राठोड यांची पाच वर्षांची मुलगी चेतना घराजवळील एका किराणा दुकानाच्या समोर रस्त्याच्या कडेला शौचाला बसली होती. त्यावेळी एका भरधाव वाहनाने बालिकेला चिरडले. वाहन अंगावरून गेल्याने बालिकेचा कमरेपासून पोटापर्यंतचा भाग फाटला. या अपघातामुळे प्रचंड रक्तस्त्राव होऊन बालिकेचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर वाहन चालक लगेच पसार झाला.
अपघाताच्या वेळी जवळपास कुणीच नव्हते. त्यामुळे वाहन नेमके कोणते होते, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र परिसरातील काही लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार इनोव्हा कारने बालिकेचा बळी घेतल्याचे समोर आले आहे. परिसरातील आस्थापनांच्या सीसी कॅमेर्‍याचे फुटेज तपासून वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक ए.टी. वाघ या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या भागात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे अधिकारी वाहनांची चाचणी घेण्याचे काम करतात. या अपघातामागे हेदेखील एक कारण असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली. बालिकेच्या घरची परिस्थिती सर्वसाधारण आहे. तिचे वडिल चालक असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक वाघ यांनी दिली.

Web Title: baby died in Thane as unknown vehicle hit her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.