अनैतीक व्यवसायात बांगलादेशी अल्पवयीन मुलीची सुटका, नऊ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 09:32 PM2018-01-09T21:32:58+5:302018-01-09T21:38:18+5:30

लॉजमध्ये अनैतीकरित्या वेश्या व्यवसायासाठी बांगलादेशी मुली व महिलांचा वापर

Bangladeshi minor girl rescued in an illicit business, nine people were arrested | अनैतीक व्यवसायात बांगलादेशी अल्पवयीन मुलीची सुटका, नऊ जणांवर गुन्हा दाखल

अनैतीक व्यवसायात बांगलादेशी अल्पवयीन मुलीची सुटका, नऊ जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देआर्थिक परिस्थीतीचा गैरफायदा घेत सेक्स वर्कर परिसरांत व लॉजींगमध्ये मोठ्या संख्येने बांगलादेशी महिलांचा वावरअल्पवयीन मुलीस रिक्षामधून आणून पैश्याचे आमिष दाखवीत ग्राहकासोबत शरीर संबधास केले प्रवृत्तकोनगाव पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी केला नऊ जणांवर गुन्हा दाखल

भिवंडी : भिवंडी-कल्याणरोड दरम्यान लॉजमध्ये अनैतीकरित्या वेश्याव्यवसाय सुरू असुन त्यामध्ये बांगलादेशी मुलींचा मोठ्या संख्येने वापर केला जात आाहे. याची खबर पोलीसांना मिळाल्यानंतर हॉटेल राज लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डींगमध्ये पोलीसांनी घातलेल्या धाडीत आढळून आलेल्या एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीची सुटका करण्यात आली.
बांगलादेशांतून आलेल्या पुरूषांवर पोलीस कारवाई होऊ लागल्याने पैसे कमाविण्यासाठी बांगलादेशी महिला व अल्पवयीन मुली पुढे येऊ लागल्या आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थीतीचा गैरफायदा घेत शहरातील सेक्स वर्कर परिसरांत व लॉजींगमध्ये मोठ्या संख्येने बांगलादेशी महिलांचा वावर सुरू झाला आहे.मागील आठवड्यात येथील सेक्स वर्कर परिसरांतून काही बांगलादेशी महिलांवर कारवाई झाली आहे.तर काल सोमवार रोजी दुपारी कल्याणरोडवरील पिंपळास गावातील राजाजी पॅलेसमधील राज लॉजींग अ‍ॅण्ड बोर्डींगमध्ये बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर कोनगाव पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी धाड टाकली. त्या लॉजमध्ये ग्राहकांच्या मागणीवरून अल्पवयीन मुलीस रिक्षामधून आणून तिच्या आर्थिक परिस्थीतीचा गैरफायदा घेत लॉज चालकांनी पैश्याचे आमिष दाखवीत ग्राहकासोबत शरीर संबधास प्रवृत्त केले. तसेच या साठी ग्राहकाकडून पैसे स्विकारून सदर मुलीला लॉजमधील रूम क्र.१०२मध्ये पाठविले. अशा वेश्या व्यवसाच्या माध्यमांतून स्वत:ची उपजीविका व अपव्यापार करणाºया नऊ जणांवर कोनगाव पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी रिक्षा चालक इब्राहिम दस्तगीर शेख,लॉज चालक व व्यवस्थापक हरिप्रसाद नंदप्पा शेट्टी,कॅशीयर रमाकांत पितांबर राऊत यांना पोलीसांनी अटक केली आहे.तर लॉज चालक शिवराम भंडारी याच्यासह पाच जणांचा शोध पोलीस घेत आहेत. या ठिकाणी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलीची पोलीसांनी सुटका करून तीला शहरातील बालसुधार गृहात पाठविले आहे.

Web Title: Bangladeshi minor girl rescued in an illicit business, nine people were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.