जिल्ह्यातील लाभार्थी बोलणार मुख्यमंत्र्यांशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:18 AM2018-12-30T00:18:18+5:302018-12-30T00:18:35+5:30

विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा यांची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोकसंवाद’ करून घेणार आहेत.

 The beneficiaries of the district will call Chief Minister | जिल्ह्यातील लाभार्थी बोलणार मुख्यमंत्र्यांशी

जिल्ह्यातील लाभार्थी बोलणार मुख्यमंत्र्यांशी

googlenewsNext

ठाणे : विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा यांची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोकसंवाद’ करून घेणार आहेत. यासाठी २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता लाभार्थी आणि मुख्यमंत्री यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणारा संवाद मोबाइल, संगणक, टॅब आणि लॅपटॉपवरही लाइव्ह पाहता येणार आहे.
‘लोकसंवाद’ हा लाइव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या devendra.fadnavis या फेसबुक पेजवर, Dev_Fadnavis  या टिष्ट्वटर हॅण्डलवर व Devendra.Fadanvis या यु-ट्यूूब चॅनलद्वारे तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्याfacebook.com/MahaDGIPR या फेसबुक पेज आणि youtube.com/maharashtradgipr  यु-ट्यूूब चॅनलवर पाहता येणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण), उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, सूक्ष्म सिंचन आणि मृदा परीक्षणसारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे.

Web Title:  The beneficiaries of the district will call Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे