नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरु होणार पाच क्लस्टरचा बायोमेट्रीक सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 04:14 PM2018-12-25T16:14:34+5:302018-12-25T16:16:35+5:30

ठाणे शहरातील क्लस्टरचा मार्ग टप्याटप्याने मोकळा होऊ लागला आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत क्लस्टरच्या पाच भागांना मंजुरी मिळाल्यानंतर आता या पाच भागांचा बायोमेट्रीक सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यानुसार यासाठी पालिकेने टिम तयार केल्या आहेत.

Biometric Survey of five clusters to be started from the first day of the new year | नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरु होणार पाच क्लस्टरचा बायोमेट्रीक सर्व्हे

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरु होणार पाच क्लस्टरचा बायोमेट्रीक सर्व्हे

Next
ठळक मुद्देपाच विविध कक्ष स्थापन करण्याचा निर्णयहरकती सुचनाही स्विकारल्या जाणार

ठाणे - ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कोपरी, हाजुरी, राबोडी, किसननगर आणि लोकमान्यनगर या क्षेत्राच्या क्लस्टरचे बायोमेट्रीक सर्वेक्षण १ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश मंगळवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. तसेच ३० जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांची अंतीम पात्रता यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या.
              दरम्यान क्लस्टरच्या कामाला गती मिळावी तसेच क्लस्टरसंबंधी प्राप्त होणाऱ्या तक्र ारींचा तातडीने निपटारा करण्याबाबत ५ विविध कक्ष स्थापन करण्याचा महत्वाचा निर्णयही त्यांनी क्लस्टर आढावा बैठकीत घेतला. कोपरी, हाजुरी, राबोडी, किसननगर आणि लोकमान्यनगर या क्षेत्रांचा नागरी पुनरूत्थान आराखड्यांना मंजुरी प्राप्त झाली असून या योजनेतील लाभार्थ्यांची पात्रता यादी निश्चित करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांच्या स्तरावर १ जानेवारीपासून ते १५ जानेवारीपर्यंत बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. १५ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत त्याविषयीच्या हरकती स्वीकारण्यात येणार असून २३ जानेवारी ते २८ जानेवारीपर्यंत परिमंडळ उपायुक्त स्तरावर त्यांची सुनावणी होणार आहे. ही सुनावनी झाल्यानंतर ३० जानेवारीपर्यंत अंतीम पात्रता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जागा मालक व लाभार्थी सदरची योजना कोणाच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहे याचा निर्णय घेतील. हा निर्णय त्यांच्या स्तरावर न झाल्यास महापालिकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रि येचा अवलंब करून विकासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
                दरम्यान या योजनेला गती मिळावी तसेच या योजनेच्या अनुषंगाने प्राप्त होणाºया तक्र ारींचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ५ विविध कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये पात्रता आणि लाभार्थ्यांच्या अनुज्ञेय क्षेत्राविषयी निर्णय घेण्याबाबत परिमंडळ उपायुक्त यांच्या स्तरावर एका कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता यांचा समावेश राहणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेच्या अनुषंगाने शाळा, हॉस्पीटल किंवा उद्यान अशा ज्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत त्याबाबत निर्णय घेण्याबाबत नगर अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये शहर विकास विभागाचे अधिकारी आणि संबंध प्रभाग समितीचा कार्यकारी अभियंता यांचा समावेश राहणार आहे. हा कक्ष अस्तित्वातील सुविधा नियमित करणे, स्थलांतरित करणे, आवश्यकता वाटल्यास ती निष्काषित करणे किंवा नव्याने समाविष्ट करणे याबाबत निर्णय घेणार आहे.
या योजनांच्या अनुषंगाने छाननी सल्ला कक्षाची निर्मिती करण्यात येणार असून यामध्ये निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी किंवा उप जिल्हाधिकारी, निवृत्त तहसिलदार, निवृत्त तालुका किवा जिल्हा भूमापक अधिकारी तसेच निवृत्त सहकारी उप निबंधक यांचा समावेश राहणार आहे. तर कायदेविषक बाबींसाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात येणार असून यामध्ये विधी सल्लागार तसेच दोन ज्येष्ठ विधिज्ञांचा समावेश राहणार आहे.



 

Web Title: Biometric Survey of five clusters to be started from the first day of the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.