ठाणे जिल्ह्यातील १०१ ठिकाणांची नाकाबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 04:00 AM2019-10-09T04:00:33+5:302019-10-09T04:00:41+5:30

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्याभरातील १८ मतदारसंघातील नाक्यांवर प्रशासनासह पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

Blockade of 5 places in Thane district | ठाणे जिल्ह्यातील १०१ ठिकाणांची नाकाबंदी

ठाणे जिल्ह्यातील १०१ ठिकाणांची नाकाबंदी

Next

ठाणे : जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये प्रचार लवकरच शिगेला पोहोचणार आहे. या कालावधीमध्ये ठिकठिकाणच्या नाक्यांवरून अवैध मद्यसाठ्यासह शस्त्रे, रोकड, अंमली पदार्थ आदींचा होणारा सुळसुळाट वेळीच थांबवण्यासाठी जिल्ह्यात १०१ ठिकाणी नाकाबंदी केल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्याभरातील १८ मतदारसंघातील नाक्यांवर प्रशासनासह पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीतील ६३ ठिकाणी तर नवी मुंबई पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीतील १२ ठिकाणी नाकाबंदी केली आहे. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात २६ ठिकाणांवर पोलीस यंत्रणा सतर्क केली असून नाकाबंदी कडक करण्यात आली आहे. यामुळे अवैध कृत्यांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Web Title: Blockade of 5 places in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस