बोगस डॉक्टर, साथीदाराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 03:55 AM2018-06-13T03:55:58+5:302018-06-13T03:55:58+5:30

दुसऱ्याच एका डॉक्टरच्या नावाचे वैद्यकीय प्रमाणपत्र लावून रुग्णांवर उपचार करणाºया एका बोगस डॉक्टरसह त्याला स्वत:च्या नावाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणाºयाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली.

Bogus doctor, arrested by the spouse | बोगस डॉक्टर, साथीदाराला अटक

बोगस डॉक्टर, साथीदाराला अटक

Next

कल्याण - दुसऱ्याच एका डॉक्टरच्या नावाचे वैद्यकीय प्रमाणपत्र लावून रुग्णांवर उपचार करणाºया एका बोगस डॉक्टरसह त्याला स्वत:च्या नावाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणाºयाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली.
पश्चिमेतील बैल बाजार परिसरात ‘सिफा हेल्थ क्लिनिक’ नावाने रफिक नासिर शेख (२९, रा. मुंब्रा) हा क्लिनिक चालवत होता. याठिकाणी त्याच्याकडून गुप्तरोगावर उपचार केले जात होते. शेख हा परवाना नसतानाही हे क्लिनिक चालवत असल्याची माहिती पोलीस नाईक सचिन नाईक यांना खबºयांमार्फत मिळाली होती. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी पथकाद्वारे या क्लिनिकमध्ये छापा टाकला.
रफिककडे वैद्यकीय प्रमाणपत्र, क्लिनिक चालवायचा परवाना व अन्य शैक्षणिक कागदपत्रांची मागणी केली असता त्याने त्यास असमर्थता दाखवली. मुश्ताक गुलाम हुसेन शेख (४४, रा. अंधेरी) या डॉक्टरच्या नावाचे प्रमाणपत्र क्लिनिकमधील भिंतीवर लावलेले आढळले. या प्रमाणपत्राच्या आधारेच रफिक स्वत: डॉक्टर असल्याचे भासवत रुग्णांवर बेकायदा उपचार करीत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी रफिकबरोबरच त्याला आपल्या नावाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणाºया मुश्ताकलाही अटक केली.
रफिक याने आतापर्यंत अनेकांवर उपचार करुन मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती तायडे यांनी दिली. तसेच, ठाणे आणि मुंबईमध्ये अशाच बोगस डॉक्टरांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यताही व्यक्त
केली आहे.
 

Web Title: Bogus doctor, arrested by the spouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.