भाई मेरे पर नाराज है! आपले भारतात एकही बँक अकाउंट नाही, इक्बाल कासकरचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 05:45 AM2017-09-24T05:45:04+5:302017-09-24T05:45:04+5:30

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी दोन वर्षांपूर्वी चार वेळा बोलणे झाल्याचा दावा करणा-या इक्बाल कासकर याने आपण व्यसनाधीन असल्याने दाऊद आपल्यावर नाराज असल्याची माहिती शनिवारी पोलिसांना दिली.

Brother is angry with me! There is no bank account in your country, Iqbal Kaskar claims | भाई मेरे पर नाराज है! आपले भारतात एकही बँक अकाउंट नाही, इक्बाल कासकरचा दावा

भाई मेरे पर नाराज है! आपले भारतात एकही बँक अकाउंट नाही, इक्बाल कासकरचा दावा

Next

ठाणे : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी दोन वर्षांपूर्वी चार वेळा बोलणे झाल्याचा दावा करणा-या इक्बाल कासकर याने आपण व्यसनाधीन असल्याने दाऊद आपल्यावर नाराज असल्याची माहिती शनिवारी पोलिसांना दिली. खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या कासकरच्या बँक अकाउंटबद्दल चौकशी केली असता आपले बँक अकाउंटच नसल्याची लोणकढी थापही त्याने मारली.
बिल्डरकडून खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात अटकेत असलेला कासकर दररोज उलटसुलट दावे करत असून पोलिसांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. इक्बालने आपला भंगारचा धंदा असल्याचे सांगितले. तसेच तो राहत असलेल्या परिसरात त्याचा एक दुकानाचा गाळा असून त्याने तो भाड्याने दिला आहे. महिनाकाठी त्याचे ३० ते ४० हजार रुपये भाडे येते. त्यावरच आपला उदरनिर्वाह सुरू असल्याचा हास्यास्पद दावा त्याने केला आहे. आपल्याला वेगवेगळी व्यसने असून त्यामुळे दाऊद आपल्यावर नाराज असल्याचे त्याचे म्हणणे आहे. दाऊदबद्दल दररोज नवनवी तसेच परस्परविरोधी माहिती
देऊन पोलिसांना गोंधळात टाकण्याची सराईत गुन्हेगाराची कार्यशैली कासकरने अवलंबली आहे.
मुंबईत, राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुकच्या अनावरण कार्यक्रमात दाऊद हा आजारी असल्याचे व त्यामुळे तो स्वत:हून भारतात येत असल्याचे म्हटले होते. इक्बालने मात्र दाऊदची प्रकृती ठणठणीत असल्याचा दावा केला आहे.

पश्चाताप होतोय...
कराचीत दाऊदचे तीन बंगले असून एका बंगल्यात दाऊद आणि अनिस हे दोघे कु टुंबासह वास्तव्य करतात. उर्वरित दोन बंगल्यांत त्यांचे साथीदार राहतात. माझ्या परिवाराने मला मुंबईत राहू नको. दुबईलाच थांब, असे सांगितले होते. परंतु, मी त्यांचे ऐकले नाही. त्याचा आज पश्चात्ताप होत असल्याचेही कासकरने पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील बिल्डर, सोने-चांदी व्यापारी यांच्याकडे इक्बालने मोठमोठ्या रकमांची खंडणी मागितल्याच्या तक्रारी असल्याने पोलिसांनी कासकरकडे त्याच्या बँक खात्याबाबत वारंवार विचारणा केली असता त्याने आपले बँक खाते नसल्याची चक्क थाप मारली. माझे बँक खाते असते, तर मी दिलेला धनादेश कोणी स्वीकारला असता का, असा शहाजोग सवाल इक्बालने पोलिसांना केल्याचे समजते.

पेट्रोलपंप घोटाळ्याच्या तपासामुळे झाले दुर्लक्ष
कासारवडवली येथील खंडणी प्रकरण हे
मे महिन्यातील आहे. याबाबत ठाणे खंडणीविरोधी पथकाबरोबर अन्य गुन्हे शाखेचे युनिट माहिती गोळा करत होते. मात्र, पेट्रोलपंप घोटाळ्यामुळे या प्रकरणाकडे
थोडे दुर्लक्ष झाले. या प्रकरणाची माहिती गोळा करत असलेल्या सर्व अधिकाºयांची शनिवारी पोलीस उपायुक्तांनी तातडीने
बैठक बोलावली होती.

दाऊदबद्दल दररोज नवनवी तसेच परस्परविरोधी माहिती देऊन पोलिसांना गोंधळात टाकण्याची सराईत गुन्हेगाराची कार्यशैली कासकरने अवलंबली आहे.
 

Web Title: Brother is angry with me! There is no bank account in your country, Iqbal Kaskar claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस