महागड्या मोटारसायकली चोरून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 11:03 PM2018-12-27T23:03:41+5:302018-12-27T23:38:29+5:30

कोणत्याही भागात उभी केलेली स्पोर्ट्स मोटारसायकल धर्मेश आणि त्याची टोळी हेरायचे. त्यानंतर, इग्निशनची वायर जोडून गाडीची ते चोरी करायचे. या त्रिकुटाने ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि अहमदनगर आदी भागांतून १२ लाखांच्या १६ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.

Busted gang of stolen motorcycles | महागड्या मोटारसायकली चोरून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

महागड्या मोटारसायकली चोरून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

googlenewsNext
ठळक मुद्देत्रिकूट गजाआड १२ लाखांच्या १६ दुचाकी हस्तगतठाणे गुन्हे शाखेची कामगिरी

ठाणे : महागड्या स्पोर्ट्स बाइकची चोरी करून त्या निम्म्या किमतीमध्ये विक्री करणा-या टिटवाळ्यातील धर्मेश रावत (२१), योगेश जाधव (२१) आणि ऋषिकेश चन्ने या त्रिकुटाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १५ मोटारसायकलचोरीचे गुन्हे उघड झाले असून १२ लाख १० हजारांच्या १६ दुचाकी हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी गुरुवारी दिली.
ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरातील महागड्या मोटारसायकलचोरीचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले होते. यावर नियंत्रण मिळवण्याचे आणि या चोºया उघड करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सर्व पोलीस ठाण्यांसह गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. त्यांचा समांतर तपास सुरू असताना कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरातील अशाच गुन्ह्यातील फरारी आरोपी धर्मेशला वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद सानप, मिलिंद पिंगळे, उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड, जमादार सोपान पाटील, शामराव कदम, हवालदार बाळासाहेब भोसले, गणेश पाटील, नामदेव देशमुख, वसंत बेलदार, पोलीस शिपाई नरसिंग क्षिरसागर, अरविंद शेजवळ, आदिती तांबे, सुनिता सानप आणि सुवर्णा जाधव आदींच्या पथकाने कळवा येथून १५ डिसेंबर रोजी अटक केली. त्यानेच दिलेल्या माहितीच्या आधारे योगेश जाधव आणि मोटारसायकलचा मेकॅनिक चन्ने यांना १९ डिसेंबर रोजी टिटवाळ्यातून अटक केली. धर्मेश आणि योगेश या दोघांनी मिळून चोरलेल्या मोटारसायकली त्यांनी चन्ने याच्यामार्फत विकल्याचेही चौकशीत उघड झाले. त्यांच्याकडून तीन केटीएम, एक यामाहा एफझेडएस, एक आर १५ यामाहा, सहा बजाज पल्सर अशा १६ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. त्यांनी ठाणे, कल्याण, उल्हासनगर, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, रायगड, अहमदनगर आदी भागांतून त्या चोरल्याची कबुली दिली. त्यांना २९ डिसेंबर २०१८ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
...................
अशी होती गुन्ह्याची पद्धत
कोणत्याही भागात उभी केलेली स्पोर्ट्स मोटारसायकल धर्मेश आणि त्याची टोळी हेरायचे. त्यानंतर, पुन्हा त्याठिकाणी जाऊन तिचे हॅण्डल लॉक तोडून ती ढकलत काही अंतर पुढे घेऊन जायचे. नंतर, इग्निशनची वायर जोडून गाडी थेट सुरू करून तिची चोरी करायचे. पुढे अशा गाड्यांसाठी गि-हाईक शोधून तिची ४० ते ५० हजारांमध्ये विक्री ते करत होते. एक लाख ८० हजारांच्या एका मोटारसायकलची तर आरटीओकडे रजिस्ट्रेशन होण्याच्या आधीच त्यांनी चोरी केली होती. आपली नवीकोरी गाडी पोलिसांनी शोधल्यानंतर या तक्रारदाराने रवींद्र वाणी यांच्या पथकाचे आभार मानले.
................

Web Title: Busted gang of stolen motorcycles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.