विक्रीकर बुडवणा-या टोळीचा पर्दाफाश, १३ राज्यांचे बनावट सी फॉर्म जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 04:30 AM2017-09-15T04:30:19+5:302017-09-15T04:30:34+5:30
बनावट सी फॉर्मच्या आधारे विक्रीकर बुडवणाºया आंतरराज्य टोळीचा ठाणे पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश केला. चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १३ राज्यांचे बनावट सी फॉर्म जप्त करण्यात आले आहेत.
ठाणे : बनावट सी फॉर्मच्या आधारे विक्रीकर बुडवणाºया आंतरराज्य टोळीचा ठाणे पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश केला. चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १३ राज्यांचे बनावट सी फॉर्म जप्त करण्यात आले आहेत.
नियमानुसार ज्या व्यापाºयाकडून माल विकत घेतला, त्याने स्वत:च्या राज्यात कर भरला असेल, तर माल घेणाºयास पुन्हा कर भरावा लागत नाही. त्यासाठी ज्याच्याकडून माल घेतला, त्याने कर भरल्याचा सी फॉर्म विक्रीकर विभागाला द्यावा लागतो. असे बनावट सी फॉर्म बनवून त्यांची विक्री करणाºया एकाची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली. ठाणे रेल्वे स्थानकावरील हॉटेलमध्ये तो येणार असल्याने पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. रमेश कांतिलाल शाह (वय ६७) असे त्याचे नाव असून तो बनावट सी फॉर्म कांदिवलीतील नीलेश सेठ (वय ५०) याला विकणार होता. त्यानुसार पोलिसांनी सेठलाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडील सी फॉर्म बनावट असल्याचे विक्रीकर विभागाने स्पष्ट झाले. अहमदाबाद येथील अशोककुमार मिश्रा व सांताक्रूझ येथील आशिषकुमार दुबे यांनाही आरोपींनी फॉर्म विकल्याचे चौकशीतून समोर आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अशोक मिश्राला अहमदाबाद तर आशिष दुबेला सांताकू्रझ येथून अटक केली.
बनावट सी फॉर्मसाठीचे साहित्य पोलिसांनी कांदिवलीतील शाहच्या कार्यालयातून जप्त केले. केरळ, महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब अशा १३ राज्यांचे बनावट सी फॉर्म आरोपीजवळ तयार होते. ते देखील जप्त केले आहेत.
पोलीस चौकशी सुरू
अहमदाबाद येथील अशोक मिश्रा याने २०१२-१३ मध्ये वापरलेल्या बनावट सी फॉर्मच्या १५ छायांकित प्रती तसेच पुढील वर्षात वापरण्यासाठी केलेल्या काही बनावट सी फॉर्मच्या प्रतीही पोलिसांना मिळाल्या. आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.