ठाण्यात पार पडली व्यंगचित्रकला कार्यशाळा, ज्येष्ठ चित्रकार महेश कोळी यांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 04:32 PM2018-01-14T16:32:41+5:302018-01-14T16:36:51+5:30

ठाण्यात हौशी व्यंगचित्रकारांसाठी रविवारी सकाळी व्यंगचित्रकला कार्यशाळा पार पडली. यावेळी ज्येष्ठ चित्रकार महेश कोळी यांच्यासह अनेकांनी मार्गदर्शन केले.

Cartoon workshop completed in Thane, guidance by veteran artist Mahesh Koli | ठाण्यात पार पडली व्यंगचित्रकला कार्यशाळा, ज्येष्ठ चित्रकार महेश कोळी यांचे मार्गदर्शन

ठाण्यात पार पडली व्यंगचित्रकला कार्यशाळा, ज्येष्ठ चित्रकार महेश कोळी यांचे मार्गदर्शन

Next
ठळक मुद्देव्यंगचित्र स्पर्धेच्या धर्तीवर रविवारी व्यंगचित्रकला कार्यशाळा व्यंगचित्रातील महत्वाच्या बाबींवर जेष्ठ चित्रकार महेश कोळी यांचे मार्गदर्शनजास्तीत जास्त व्यंगचित्र पाठविण्याचे आवाहन


ठाणे: बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेवा मित्र मंडळ ठाणे, पूर्वच्यावतीने २३ जानेवारी २०१८ रोजी आयोजित केलेल्या व्यंगचित्र स्पर्धेच्या धर्तीवर रविवारी व्यंगचित्रकला कार्यशाळा घेण्यात आली.
मंगला हिंदी हायस्कुल, ठाणे पूर्व येथे ही कार्यशाळा आयोजित केली होती.

      या कार्यशाळेत व्यंगचित्रातील महत्वाच्या बाबींवर जेष्ठ चित्रकार महेश कोळी मार्गदर्शन केले. यावेळी जेष्ठ व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर, चित्रकार शैलेश साळवी, चित्रकार श्याम धुरी, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कोरगावकर उपस्थित होते. महेश कोळी यांनी उपस्थित विद्याथी, हौशी चित्रकार / व्यंगचित्रकार यांना व्यंगचित्रात कमीत कमी रेषा मधून आपले विचार जगासमोर कसे मांडावेत, एखाद्या व्यक्तिमधील व्यंग कसे ओळखावे, कार्टून आणि व्यंगचित्र यातील फरक, व्यंगचित्रकलेतील रेषांमधून दिला जाणारा संदेश महत्वाचा इत्यादी बाबींवर मार्गदर्शन केले. तसेच, सोप्या पद्धतीने कमीतकमी रेषांचा उपयोग करून योग्य तो परिणाम कसा साधायचा याचे प्रात्यिक्षकही दिले. यावेळी जेष्ठ व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी आपल्या मनातील भावना व्यंगचित्राच्या माध्यमातून कशा प्रगट करायच्या याचे मार्गदर्शन करताना सामाजिक संदेश देणारी त्यांची काही गाजलेली व्यंगचित्र काढून दाखवली व बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेली सामाजिक व्यंगचित्र स्पर्धेसाठी पाठवण्याचे आवाहन उपस्थित प्रशिक्षणार्थीना केले. गेली पाच वर्षे हा उपक्र म शिवसेवा मित्र मंडळ उत्तमरित्या आयोजित करत असल्याबद्दल आयोजकांच कौतुक केले. चित्रकार शैलेश साळवी यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून या कार्यशाळेतून परीक्षकांना काय अभिप्रेत आहे व स्पर्धेसाठी उत्तम व्यंगचित्र या कार्यशाळेतील उपस्थितांकडून अभिप्रेत आहेत अशी अपेक्षा व्यक्त केली. मंडळाचे अध्यक्ष अजय नाईक यांनी या स्पर्धेसाठी १० वर्षांवरील विद्यार्थी, ज्येष्ठ व तरु ण हौशी व्यंगचित्रकार व चित्रकारांनी ‘व्यंगचित्राच्या माध्यमातून समाजप्रबोधन’ या विषयावर जास्तीत जास्त व्यंगचित्र २० जानेवारी २०१८ पर्यंत, सायंकाळी ७ ते ९ यावेळेत, शिवसेना शाखा, मंगला शाळेसमोर, महाराष्ट्र बँकेच्या बाजूला, ठाणे पूर्व येथें पाठवावीत असे आवाहन केले आहे.

Web Title: Cartoon workshop completed in Thane, guidance by veteran artist Mahesh Koli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.