मध्य रेल्वेची वाहतूक रखडली, कसारा-उंबरमाळीदरम्यान रेल्वे रूळाला तडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 11:06 AM2019-01-05T11:06:24+5:302019-01-05T11:57:09+5:30
मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा-उंबरमाळी स्थानकादरम्यान रेल्वे रूळाला तडा गेला आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
कल्याण - मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा-उंबरमाळी स्थानकादरम्यान रेल्वे रूळाला तडा गेला आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सकाळी 9.25 वाजण्याच्या सुमारास हा बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. या खोळंब्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्याही रखडल्या आहेत. नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, कसारा व मोखावणे गेटदरम्यान उभी आहे तर 10.10 ची कसारा सीएसएमटी लोकल कसारा स्थानकात रखडली आहे.
डोंबिवली - मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कसारा-उंबरमाळी दरम्यान ९.२५ वा. रेल्वे रूळाला तडा गेल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद आहे. #Local
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 5, 2019
Mega Block on 6.1.2019.
— Central Railway (@Central_Railway) January 5, 2019
Mulund-Matunga Up slow line from 11.10 am to 3.40 pm and Chhatrapati Shivaji Maharaj Terminus-Chunabhatti/Bandra Up and Dn Harbour lines from 11.10 am to 4.10 pm. pic.twitter.com/5REyDS1F7q
(मुलुंड ते माटुंगा आणि सांताक्रुझ ते माहिमदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक)
मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर रविवारी (6 जानेवारी) मेगाब्लॉक
मुलुंड-माटुंगा रेल्वे स्थानक धीम्या मार्गावर सकाळी 11.10 वाजल्यापासून ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वांद्रे अप-डाऊन दरम्यान सकाळी 11.10 वाजल्यापासून ते दुपारी 4.10 वाजल्यापासून मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेवर रविवारी सकाळी 10 वाजून 37 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 31 मिनिटांपर्यंत ठाणे स्थानकातूून, सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. सकाळी 11 वाजून 4 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 06 मिनिटांपर्यंत कल्याण स्थानकातून सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकांवर थांबेल.
सकाळी 10 वाजून 16 मिनिटे ते दुपारी 2 वाजून 54 मिनिटांपर्यंत सीएसएमटी पासून कल्याणच्या दिशेने जाणारी जलद मार्गावरील लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबविण्यात येतील. त्यामुळे लोकल स्थानकावर पोहोचण्यास 20 मिनिटांचा विलंब लागेल. सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या सर्व लोकल पोहोचण्यास 10 मिनिटांचा विलंब लागणार आहे.
हार्बर लोकल सकाळी 11 ते 5 राहणार बंद
हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे स्थानकांच्या दिशेने जाणाºया लोकल रविवारी सकाळी 11 वाजून 40 मिनिटांपासून ते सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत बंद असतील. चुनाभट्टी आणि वांद्रे ते सीएसएमटीपर्यंत सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 40 मिनिटांपर्यंत लोकल बंद असतील. तर, सकाळी 11 वाजून 34 मिनिटांपासून ते सायंकाळी 4 वाजून 23 मिनिटांपर्यंत सीएसएमटी आणि वडाळा रोडवरून वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणारी लोकल बंद असतील.
सकाळी 9 वाजून 56 मिनिटे ते सायंकाळी 4 वाजून 16 मिनिटांपर्यंत वांद्रे, अंधेरी, गोरेगाववरून सीएसएमटीकडे जाणा-या लोकल बंद असतील. सकाळी 10 वाजून 45 मिनिटांपासून ते 4 वाजून 58 मिनिटांपर्यंत वांद्रे, अंधेरी, गोरेगाववरून सीएसएमटीकडे जाणारी लोकल सेवा बंद असतील.
सांताक्रुझ ते माहिम दरम्यान जम्बो ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुझ ते माहिम या स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 10 वाजून 35 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत जम्बो ब्लॉक आहे.
जलद मार्गावरील दोन्ही मार्गांवर जम्बो ब्लॉक आहे. या दरम्यान जलदमार्गावरील लोकल सांताक्रुझ ते माहिम दरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत, तर काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.