चल बाला, भरणार ‘आगरी शाला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 03:35 AM2018-04-23T03:35:37+5:302018-04-23T03:35:37+5:30
बोलीचा वापर वाढवण्याचा प्रयत्न : दहा दिवसांच्या प्रशिक्षणवर्गात उलगडणार भाषेचे पैलूू
ठाणे : उन्हाळ्याच्या सुट्टीत आगरी बोली भाषा शिकविणारी ‘आगरी शाला’ भिवंडीजवळ कशेळी गावात भरणार आहे. त्यात दहा दिवसांचे प्रशिक्षणवर्ग होतील. तुम्ही आगरी असा वा नसा किंवा तुम्हाला आगरी येवो किंवा नाही; परंतु आगरी बोली, तिची गोडी, साहित्य जाणण्यासाठी, आगरी भाषेवर प्रेम करणाऱ्यांसाठी हा नवा उपक्रम सुरू झाला आहे.
मुंबई, ठाणे, रायगडच्या स्थानिकांची बोली म्हणजे आगरी. अनेकांना या भाषेचे नेमके पैलू माहीत नाहीत. इंग्रजी-हिंदीच्या वाढत्या प्रभावामुळे आगरी बोलीचा वापर कमी होत चालला आहे. ती बोलणाºया वर्गाला भाषेचा विसर पडत आहे. यावर उपाय म्हणून ज्यांना आगरी बोली शिकायची आहे वा तिच्याबद्दल अधिक माहिती मिळवायची आहे त्यांच्यासाठी युवा साहित्यिक सर्वेश रवींद्र तरे यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वर्ग घेण्याचे ठरविले आहे. तरे हे स्वत: बोलीभाषा अभ्यासक असून साहित्य संमेलनात बोलीभाषा समितीचे सदस्य होते. या ‘आगरी शाला’ प्रयोगात काही तज्ज्ञ-मार्गदर्शकांचाही सहभाग असेल. त्यात आगरी शब्दकोशाचे निर्माते प्रा.सदानंद पाटील, आगरी बोली आणि संस्कृतीचे अभ्यासक मोरेश्वर पाटील, आगरी कवी-साहित्यिक गजानन पाटील, साहित्य संमेलनाच्या बोलीभाषा कट्ट्याचे अध्यक्ष डॉ. अनील रत्नाकर, कवी-साहित्यिक प्रकाश पाटील तसेच गीतकार-संगीतकार दया नाईक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या प्रयोगात सहभागी आगरी शाळेच्या विद्यार्थ्यांना लघु पाठ्यक्रम असलेले पुस्तकही मिळणार आहे. ज्यात आगरी बोलीतील पद्य आणि गद्याचा समावेश असेल. याचे संपादन मोरेश्वर पाटील आणि तरे यांनी केले आहे. या प्रशिक्षणात सर्व वयोगटातील जास्तीत जास्त आगरी भाषाप्रेमींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन तरे यांनी केले. २ं१५८ं३ं१ी@ॅें्र’.ूङ्मे वर इछुकांनी माहिती पाठवावी. या आगरी प्रयोगानंतर इतरही बोलींमध्ये असे प्रयोग करण्याचा विचार करीत असल्याचे डॉ. रत्नाकर यांनी सांगीतले. ‘आगरी शाला’ या उपक्र माअंतर्गत आगरी भाषेचे अनेक पैलू उलगडणार असल्याचे तरे यांनी सांगितले.