बंदमुळे भाजीपाल्यासह धान्याची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 05:02 AM2018-07-27T05:02:48+5:302018-07-27T05:05:26+5:30

ठाणे जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबईला होणाऱ्या अन्नधान्य, भाजीपाला, कांदा-बटाटा आदी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर बंदचा परिणाम झाला आहे

The closure caused by grains decreased with vegetables | बंदमुळे भाजीपाल्यासह धान्याची आवक घटली

बंदमुळे भाजीपाल्यासह धान्याची आवक घटली

Next

- सुरेश लोखंडे 

ठाणे : आरक्षणासाठी मराठा समाजाने वेगवेगळ्या दिवशी राज्यभरात जिल्हा बंदचे आंदोलन सुरू केले आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबईला होणाऱ्या अन्नधान्य, भाजीपाला, कांदा-बटाटा आदी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यातच, मालवाहतूकदारांचाही संप सुरू आहे. परिणामी, शहरांकडे येणाºया या जीवनावश्यक वस्तूंची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे नागरिकांना महागाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
औरंगाबादमधील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याच्या जलसमाधीच्या दुर्दैवी घटनेनंतर अवघ्या महाराष्टÑातील जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बंद पुकारले जात आहेत. आंदोलकांकडून महामार्गांवरील वाहतूक अडवून जाळपोळ केली जात आहे. यामुळे जीवनावश्यक अन्नधान्य, भाजीपाला आदी मालवाहतूक करण्यास चालक धजावत नाहीत. ठिकठिकाणी दिवसभर होणाºया आंदोलनाची झळ रात्रीच्या दरम्यान होणाºया मालवाहतुकीलाही बसली आहे. भेदरलेले चालक गाडीवर बसण्यास तयार नाहीत. यामुळे नवी मुंबई या सर्वाधिक मोठ्या बाजार समितीसह ठाणे जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांमध्ये गुरुवारीदेखील अत्यल्प भाजीपाल्यासह अन्नधान्याची आवक घटल्याचे निदर्शनात आले.
मालवाहतूक करणाºया ट्रक-टेम्पोंचा बेमुदत संप सुरू आहे. मात्र, त्यातून जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस वगळण्यास आले आहे. या संपादरम्यान जीवनावश्यक वाहतुकीवर परिणाम झाला नाही. परंतु, तीन दिवसांपासून ठिकठिकाणी झालेल्या बंदच्या आंदोलनामुळे अन्नधान्य, कडधान्य, भाजीपाला, कांदा-बटाटा, मसाला आदींचे सुमारे एक हजार ५०० ट्रक रोज होणारी मालवाहतूक मंगळवारी केवळ ८२ ट्रक आणि ८८४ टेम्पोंची आवक नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सकाळी झाल्याचे निदर्शनास आले. याखालोखाल ४८ ट्रक आणि ९७ टेम्पो मालाची आवक कल्याण या द्वितीय क्रमांकाच्या बाजार समितीमध्ये झाली आहे.

 

Web Title: The closure caused by grains decreased with vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.