आयुक्तांनी महापौरांची माफी मागावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:57 AM2018-03-27T00:57:03+5:302018-03-27T00:57:03+5:30
एकीकडे महासभेला दांडी मारणाऱ्या अधिका-यांच्या मुद्यावरून शिवसेना आणि पालिका प्रशासनात शीतयुद्ध पेटले असतानाच
ठाणे : एकीकडे महासभेला दांडी मारणाऱ्या अधिका-यांच्या मुद्यावरून शिवसेना आणि पालिका प्रशासनात शीतयुद्ध पेटले असतानाच, आता ठाण्यातील दक्ष नागरिकांनीही दांडीबहाद्दर अधिका-यांचा निषेध करून सोमवारी ठामपा मुख्यालयाजवळ आंदोलन केले. आयुक्तांनी महापौरांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
गेल्या आठवड्याच्या महासभेत महापौरांनी रेंटलच्या घराच्या मुद्यावरून प्रशासनाला धारेवर धरून अधिकाºयांनी कुटुंबासमवेत या रेंटलच्या घरात राहून दाखवावे, असे आव्हान दिले होते. परंतु, वेळेअभावी ती महासभा तहकूब झाल्याने लागलीच दुसºया दिवशी महापौरांनी महासभा लावली. परंतु, तिला सचिवांव्यतिरिक्त एकही अधिकारी फिरकला नाही. सर्व अधिकाºयांनी दांडी मारली होती. मार्चअखेर असल्याने आयुक्तांनी आधीच बैठक लावल्याचे कारण महासभेला दिले होते. परंतु, आता या मुद्यावरून महापौर विरुद्ध प्रशासन असे शीतयुद्ध रंगले असतानाच त्यात ठाण्यातील दक्ष नागरिक उन्मेष बागवे यांनीदेखील उडी घेतली. सोमवारी त्यांनी प्रशासनाचा निषेध करून मुख्यालयाच्या गेटवर आंदोलन केले. महापौरांनी बोलवलेल्या महत्त्वाच्या सभेत अनुपस्थित राहून आयुक्तांनी व अन्य अधिकाºयांनी महापौरांचा अपमान केला आहे. त्यांचा अपमान म्हणजे शहरातील प्रथम नागरिकाचा म्हणजेच प्रत्येक ठाणेकराचा अपमान आहे. दुर्दैवाने नगरसेवकही प्रशासनाला खुलेपणाने विरोध करायला घाबरत आहेत, असा सर्वांचा अनुभव आहे. आयुक्तांनी महासभेत उपस्थित न राहणे हा आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा अपमान असून अनेकदा असे घडले आहे. अधिकारी येतात आणि जातात, त्यांना आम्ही दिलेल्या करातून पगार दिला जातो. या शहरात लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. ते सर्व या प्रकारांवर गप्प का?