ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर कट्टेकरांनी लुटला हिंदी मराठी गाण्यांचा मनमुराद आनंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 04:05 PM2019-07-23T16:05:28+5:302019-07-23T16:06:58+5:30

ब्रह्मांड कट्टयावर हिंदी मराठी गाण्यांचा मनमुराद आनंद कट्टेकरांनी लुटला. 

Cuttackers looted Hindi Marathi songs in Thane Universe | ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर कट्टेकरांनी लुटला हिंदी मराठी गाण्यांचा मनमुराद आनंद 

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर कट्टेकरांनी लुटला हिंदी मराठी गाण्यांचा मनमुराद आनंद 

Next
ठळक मुद्दे कट्टेकरांनी लुटला हिंदी मराठी गाण्यांचा मनमुराद आनंद सुरेल गीतांची रंगली मैफिलस्वर लहिरी प्रस्तुत "मनमुराद गाणी"

ठाणे : ब्रह्मांड कट्ट्यावर हिंदी मराठी  नजराणा ठाणेकरांनी अनुभवला. यावेळी सुरेल गीतांची मैफिलच रंगली होती. ब्रह्मांड कट्टा सामाजिक-सांस्कृतिक मंडळ* आयोजित सांज स्नेह ज्येष्ठ नागरिक सभागृह, ब्रह्मांड पोलीस चौकी मागे, आझादनगर, ठाणे* येथे  स्वर लहिरी प्रस्तुत "मनमुराद गाणी" हा हिंदी मराठी गीतांचा सुरेल नजराणा आयोजित करण्यात आला होता. सदर संगीतमय कार्यक्रम संतोष आचारी,  रघु नायर,  संतोष साइल,  स्नेहा नायर, स्नेहा कोरडे, अर्चना, डॉ. विदुला,  मंजुषा,  प्रेरणा व प्रकाश अय्यर या गायक कलाकारांनी सादर केला. मैफलीची संगीताची बाजू पंचम टीम सांभालळी तर सचिन कांबळे यांनी आपल्या रुबाबदार शैलीत निवेदन केले. 

           कार्यक्रमाची सुरुवात ओ सजना बरखा बहार आयी व केतकीच्या बनी ह्या हिंदी मराठी गीतांनी प्रेरणा जकातदार हीने केली. नंतर रघु नायर यांने लाजून हासने व घन घन माला नभी दाटल्या ही क्लासिकल गीते घेऊ कार्यक्रमाची उंची वाढविली. तर स्नेहा नायर हीने प्रिया तो से नयना लागेले व बोले रे पप्पी हरा ही कार्यक्रमाला साजेशी गीते सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध करण्यात यशस्वी ठरली.  मराठीच्या ठसके दार लावणीच्या बाजात बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला व गारवा वाऱ्यावर भीर भीर पारवा ही सुंदर गाणी कट्टेकरांना ठेका थरायला भाग पाडले.  कार्यक्रमाचे आयोजक संतोष आचारी यांनी आने वाला पल जाने वाला है तर संतोष साइल यांने रिमझिम गिरे सावन व मनाच्या धंदीत लहरीत येना तर प्रकाश अय्यर यांने तुमसे मिलने की तम्मना है व चल चल मेरे संग चल अशी विविध मूडची गाणी मनमुराद गाण्याच्या कार्यक्रमात सादर केली. द्वंद्वगीतांनी तर कार्यक्रमाची लज्जत वाढविली यामध्ये मेरे प्रिया गये रंगून,  सावन बरसे तरसे जिल ये,  दिवाना हुआ बादल,  जानेमन जानेमन तेरे दो नयन. अब के सावन मै जी डरे,  यह रात  भिगी भिगी तर आश्विनी ये ना व कजरा मोहब्बत वाला, हसता हुआ नु राणी चेहरा व दमा दम मस्त कलंदर या गीतांनी रसिकांनी नृत्य करायला लावले.  या सर्व गीतांना सुरेख वाद्यची साथ कि बोर्ड वर अक्षय कावळे ऑक्टोपैडवर पियुष कदम व ढालकी तब्बल्यावर जयंता बागडे यांनी सुंदर साथ दिली. सचिन कांबळे यांचे खुमासदार निवेदन कार्यक्रमात मोलाचे काम केले. ब्रह्मांड कट्टयावर प्रथमच श्रीजी टेलिकोम यांच्यावतीने सेल्फी पाँईट  व रसिकांना प्रश्नमंजुषात बक्षीसे देण्यात आली तर आरती कटर्ससच्या वतीने गरमा गरम कांदा व बटाटा भजी व चहा आस्वाद रसिकांना घेता आला. कार्यक्रमाचा शेवट  ब्रह्मांड कट्टयाचे आयोजक राजेश जाधव यांनी आभार मानले तर महेश जोशी यांनी कलाकारांचे स्वागत केले.

Web Title: Cuttackers looted Hindi Marathi songs in Thane Universe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.