उल्हासनगरातील स्फोटातील जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 09:34 PM2017-10-02T21:34:42+5:302017-10-02T21:34:53+5:30

महापालिका शेडजवळील मलेरिया ऑईल ड्रमच्या  स्फोटात गंभीररित्या भाजलेल्या अरिहंत सिंग या मुलाचा मृत्यू झाला. 

Death of a child who died in a blast in Ulhasanganagar | उल्हासनगरातील स्फोटातील जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू

उल्हासनगरातील स्फोटातील जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू

Next

उल्हासनगर : महापालिका शेडजवळील मलेरिया ऑईल ड्रमच्या  स्फोटात गंभीररित्या भाजलेल्या अरिहंत सिंग या मुलाचा मृत्यू झाला. महानगरपालिका प्रशासन या  प्रकरणास जबाबदार असल्याची टीका स्थानिक नागरिकांनी पोलीस उपायुक्त गोयल यांना संबंधित अधिकारी व कर्मचा-यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

उल्हासनगर कॅम्प नंबर १ येथील टिळकनगर या ठिकाणी मनपाच्या हजेरी शेडजवळ ड्रम मध्ये ठेवलेल्या कीटकनाशक फवारणी रसायनाचा स्फ़ोट होऊन अरिहंत राजेश सिंह(  ९ ), प्रवीण सोनी (१३ ) हर्ष सोनी (१५ ) ही मुले जखमी झाले होते त्यातील अरिहंत राजेश सिंहचा रुग्णालयात उपचार घेत असतांना काल रविवारी मृत्यू झाला.

मनपाच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडला असून याप्रकरणी मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा मागणीसाठी स्थानिक समाजसेवक संतोष पांडे , संजय सिंग यांच्यासह स्थानिक नागरिकांनी करून, रस्त्यावर उतरले. त्यांनी प्रथम पोलीस उपायुक्त कार्यालयाला घेराव घातला . त्यानंतर उल्हासनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता .  तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात मय्यत मुलाच्या वडीलांचा जवाब नोंदवण्यात आला आहे .

Web Title: Death of a child who died in a blast in Ulhasanganagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.