ठाणे जिल्ह्यात वीजेच्या धक्याने दोघांचा मृत्य; धरणातील पाणी साठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 04:44 PM2019-06-29T16:44:05+5:302019-06-29T16:55:39+5:30

ठाणे : जिल्ह्यात तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या दरम्यान रात्रभरातील वीजेच्या धक्याच्या दुर्घटनेत अंबरनाथसह ठाण्यातील दोन जणांचा मृत्यू झाला. तर काही ...

Death of two people in Thane district; Increased water storage in the dam | ठाणे जिल्ह्यात वीजेच्या धक्याने दोघांचा मृत्य; धरणातील पाणी साठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढलेला असल्यामुळे पाणी साठ्यात वाढ

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात सरासरी १९०.९४ मिमी.सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात २५० मिमी.१७१ मिमी. सर्वाधिक पाऊस बारवी धरणात

ठाणे : जिल्ह्यात तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या दरम्यान रात्रभरातील वीजेच्या धक्याच्या दुर्घटनेत अंबरनाथसह ठाण्यातील दोन जणांचा मृत्यू झाला. तर काही उल्हासनगरमधील मार्केटमध्ये पाणी साचले. जिल्ह्यात सरासरी १९०.९४ मिमी. पडल्याची नोंद झाली असून धरणांच्या पाणी साठ्यात दीड ते सव्वा दोन टक्केने वाढ झाली आहे.
       येथील पश्चिमेकडील शिरोर पाडा येथे वीजेच्या तारावर झाडाची फांदी पडली. त्याव्दारे वीजेचा धक्का बसून नागेश मलअप्पा निरंगे (४६) यांचा मृत्यू झाला. या प्रकारची दुर्घटना आंबरनाथ रेल्वे स्टेशनबाहेरील परिसरात झाडाच्या फांदीमुळे वीजेचा धक्का लागून स्टँडवर उभ्या असलेल्या रिक्षातील चालक विश्न नामक व्यक्तीचा मृत्यू झाला. तर येथील कामगार नाक्याजवळी इंदिरा नगरकडे जाणाऱ्या रस्त्यात रात्री झाड पडल्याची घटना घउली. या दुर्दैवी घटने व्यतिरिक्त जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना घडली नसल्याचे दिसून येत आहे.
        जिल्ह्यात एक हजार ३३६ मिमी पाऊस पउला. यामध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात २५० मिमी. तर या खालोखाल कल्याणला २३८ मिमी, ठाणेला २२८, उल्हासनगरला २०८, अंबरनाथला १८७, शहापूरला १७० मिमी. पाऊस पडला. सर्वात कमी पाऊस मुरबाड तालुक्यात ५५ मिमी पाऊस पडला. आहे.जिल्ह्यात सरासरी १९०.९४ मिमी. पाऊस मागील २४ तासात पडल्याची नोंद करण्यात आली आहे.याप्रमाणेच जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढलेला असल्यामुळे पाणी साठ्यात वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
        भातसा धरणात १७० मिमी. तर मोडकसागरमध्ये ११९, तानसात १२७ मिमी पाऊस पडला आहे. याप्रमाणेच बारवी धरणातील पाणी साठ्यातही वाढ झाल्याचे आढळून आले. या धरणात रात्रभरात सब्बा दोन टक्के पाणी साठा वाढला असून तो आता १५.२० टक्के आहे. या धरणात १७१ मिमी. सर्वाधिक पाऊस पडला. या बारवी धरणातील पाणलोटक्षत्रापैकी खानीवरे परिसरात १६२ मिमी, कानहोल परिसरात १६१ मिमी. पाटगाव क्षेत्रात १८४ आणि ठाकूरवाडी परिसरात १३१ मिमी पाऊस या पाणलोट क्षेत्रात पडल्यामुळे पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

Web Title: Death of two people in Thane district; Increased water storage in the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.