नीळकंठ ग्रीन्सवासीयांची ठामपाविरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 03:44 AM2018-03-19T03:44:27+5:302018-03-19T03:44:27+5:30
नीलकंठ ग्रीन्स सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या ठाणे महापालिकेच्या जागेवर लवकरच महाविद्यालय सुरू होत आहे. त्यासाठी रहदारीचा रस्ता हा ग्रीन्सच्या आवारातूनच दिला जाणार असून, त्यामुळे सोसायटीची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते
ठाणे : नीलकंठ ग्रीन्स सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या ठाणे महापालिकेच्या जागेवर लवकरच महाविद्यालय सुरू होत आहे. त्यासाठी रहदारीचा रस्ता हा ग्रीन्सच्या आवारातूनच दिला जाणार असून, त्यामुळे सोसायटीची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते याच्या निषेधार्थ नीळकंठ ग्रीन्सवासियांनी रविवारी सकाळी सोसायटीच्या गेटवर निदर्शने केली. निदर्शनाद्वारे त्यांनी महापालिका आणि विकासकाचा निषेध केला.
मानपाडा येथील नीळकंठ ग्रीन्स सोसायटीत सुमारे ८०० हून अधिक फ्लॅटस् आणि ६००० पेक्षा अधिक रहिवासी राहतात. या सोसायटीच्या मागच्या बाजूस बांधण्यात येणाऱ्या महाविद्यालयात अनेक विद्यार्थी येण्याची शक्यता आहे आणि त्यांना रहदारीसाठी ग्रीन्सच्या आवारातील रस्ता दिल्यास सुरक्षा राहणार नाही. गेल्या अनेक वर्षात विकासकाने आम्हा रहिवाशांना किंवा नव्याने घर खरेदी करणाºया ग्राहकांपैकी कोणालाही कल्पना दिली नाही. उलट या जागेवर भविष्यात गार्डन किंवा अॅम्फिथिएटर होऊ शकते, असे सांगितले होते. मात्र येथे होणाºया महाविद्यालयासाठी सोसायटीच्या आवारातून रस्ता जाणार असल्याची बाब आम्हाला काही दिवसांपूर्वी समजली. त्यामुळे बिल्डर आणि ठाणे महापालिकेच्याविरोधात मोर्चा काढला. यावेळी त्यांनी ‘सेव्ह सोसायटी’, ‘महाविद्यालय चांगले पण सोसायटीच्या आवारातून नको’ असे फलक दिसले.
आम्ही रहिवाशांनी याबाबत विकासकाला निवेदनाद्वारे विचारणा केली मात्र याठिकाणी काय उभे राहणार, याची नेमकी कल्पना मलाही नव्हती, असे विकासकाने सांगितले. या संदर्भात ठाणे महानगरपालिकेलाही निवेदन दिले होते. त्याला अनुसरून याबाबत सोमवारी चर्चा करू असे आश्वासन महापौरांनी दिल्याचे सगिना देशमुख यांनी सांगितले. जोपर्यंत यावर समाधानकारक उत्तर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही याविरोधात लढा देणार आहोत, असे प्रकाश बोंदरे म्हणाले.
रस्ता दिल्यास सुरक्षा नाही
>रस्ता दिल्यास सुरक्षा नाही
नीळकंठ ग्रीन्स सोसायटीत ६००० पेक्षा अधिक रहिवासी राहतात. सोसायटीच्या मागच्या बाजूस बांधण्यात येणाºया महाविद्यालयात अनेक विद्यार्थी येण्याची शक्यता आहे आणि त्यांना रहदारीसाठी ग्रीन्सच्या आवारातील रस्ता दिल्यास सुरक्षितता राहणार नाही.