टंचाईच्या काळात सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी जि.प. सीईओंचा शहापूर ग्रामीण दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 07:08 PM2019-05-16T19:08:14+5:302019-05-16T19:15:38+5:30

शहापूर तालुक्यात ४६ गावे आणि १३३ गाव-पाड्यांना ट्रंकरने पाणी पुरवठा सुरु असल्याची पाहाणी या दौऱ्यांप्रसंगी बुधवारी करण्यात आली. यावेळी सोनवणे यांनी सापगाव येथील भातसा नदीवरील पंपिंग स्टेशनला भेट देवून जी.पी.एस यंत्रणेची पाहणी केली.

District for supply of water for irrigation during scarcity Shahpur rural tour of the CEO | टंचाईच्या काळात सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी जि.प. सीईओंचा शहापूर ग्रामीण दौरा

सोनवणे यांनी सापगाव येथील भातसा नदीवरील पंपिंग स्टेशनला भेट देवून जी.पी.एस यंत्रणेची पाहणी केली

Next
ठळक मुद्देप्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे शहापूर तालुक्याच्या चार पाणी पुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला होताया प्रकरणी संबधितांवर गुन्हे दाखल झाले होते.सौरउर्जेचे कामे अर्धवट सौर उर्जेवर चालणारे हात पंप बंद एवढेच नव्हे तर मुरबाड आणि शहापूर तालुक्यात रखडलेल्या ३२ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्याचा दावा

ठाणे : शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदने टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हिरालाल सोनवणे यांनी शहापूरच्या ग्रामीण, दुर्गम भागाचा दौरा करून अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
शहापूर तालुक्यात ४६ गावे आणि १३३ गाव-पाड्यांना ट्रंकरने पाणी पुरवठा सुरु असल्याची पाहाणी या दौऱ्यांप्रसंगी बुधवारी करण्यात आली. यावेळी सोनवणे यांनी सापगाव येथील भातसा नदीवरील पंपिंग स्टेशनला भेट देवून जी.पी.एस यंत्रणेची पाहणी केली. ट्रॅकरने पाणी पुरवठा सुरु ळीत सुरु राहावा यासाठी शासनाच्या माध्यमातून जी.पी.एस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचा दावा जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे. पंचायत समिती स्तरावर या जीपीएस यंणेचे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याचे ही सांगितले जात आहे.
शहापूर तालुक्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र म अंतर्गत यावर्षी दहा योजना मंजूर झाल्या आहेत. तसेच भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील रखडलेल्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या दावा जिल्हा परिषद करीत आहे. एवढेच नव्हे तर मुरबाड आणि शहापूर तालुक्यात रखडलेल्या ३२ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्याचा दावा ही जिल्हा परिषद करीत आहे. तरी देखील या शहापूर तालुक्यात २९ टॅकरव्दारे गावखेड्यांना पाणी पुरवठा होत असल्याचे वास्तव मात्र जिल्हा परिषदेचा हा दावा फोल ठरवत आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा टॅकरची संख्या देखील वाढलेली आहे. पूर्ण जिल्ह्यात गेल्या वर्षी २५ टॅकर लागले होते. यंदा शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांमध्ये ३६ टॅकरव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे.
मुख्यमंत्री पेयजल कार्यक्र मा अंतर्गत सरलांब आणि भातसे या गावांमध्ये या पाणी पुरवठा सुरु केल्याचे सांगितले जात आहे. जलयुक्त शिवार अंतर्गत शहापूर तालुक्यात १९ विहीर खोलीकरणाचे कामे मंजूर असून ते अजून कागदांवरच आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे शहापूर तालुक्याच्या चार पाणी पुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला होता. या प्रकरणी संबधितांवर गुन्हे दाखल झाले होते. यापैकी तीन योजनेचे पाणी पुरवठा सुरळीत सुरु केल्याचा दावा ही केला जात आहे. सौर उर्जेवर चालणारे हात पंप बंद पडलेले आहेत. सौरउर्जेचे कामे अर्धवट ठेवल्यामुळे ग्रामस्थाना या हातपंपाचा उपयोग होत नसल्याची गंभीर बाब निदर्शनात आलेली आहे. त्यावर मात्र जिल्हा परिषदेकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.

Web Title: District for supply of water for irrigation during scarcity Shahpur rural tour of the CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.