ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर “दिव्यांग बंधन” कार्यक्रम संपंन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 05:19 PM2018-08-27T17:19:22+5:302018-08-27T17:32:32+5:30

ठाणे महानगरपालिका,ठाणे व दिव्यांग कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानेअभिनय कट्ट्यावर "दिव्यांग बंधन"  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

"Divyang Bandhan" program ends in acting in Thane | ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर “दिव्यांग बंधन” कार्यक्रम संपंन्न 

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर “दिव्यांग बंधन” कार्यक्रम संपंन्न 

Next
ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर “दिव्यांग बंधन” आजवरच्या पोलीस कारकिर्दीत असा दिव्यांग मुलांचा कार्यक्रम बघितला नाही : प्रविण पवारया मुलांची प्रत्येक गोष्ट नैसर्गिक : संजय यादव

ठाणे :  कट्टा क्र ३९१ म्हणजे उपस्थित सर्वच प्रेक्षकांसाठी ऊर्जास्रोत्र घेऊन आला. ठाणे महानगरपालिका व दिव्यांग कला केंद्र, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने व संस्थापक किरण नाकती यांच्या संकल्पनेतुन निर्माण झालेल्या दिव्यांग बंधन हा एक नुसताच अनोखा नाही तर प्रत्येक भावा बहिणींना आदर्श वाटणारा रक्षा बंधनाचा कार्यक्रम अभिनय कट्ट्यावर संपंन्न झाला. 

      दिव्यांग बंधन कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली ती म्हणजे आपल्या आजवरच्या कारकिर्दितील चढता आलेख कायम ठेवत व गुन्हेगारी जगताचा निर्भीडपणे सामना करीत आपल्या सर्वांचं संरक्षण करणा-या नुकत्याच अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हेगारी शाखा) ठाणे या पदावर विराजमान झालेल्या प्रविण पवार यांची तसेच मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक पदापासून ते नागपुरच्या सी.ई.ओ या पदापर्यंतचा अतिशय प्रामाणिकपणे प्रवास करणाऱ्या संजय यादव यांची.  तसेच कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेचे उपसमाज विकास अधिकारी दयानंद गुंडप यांनी सुद्धा हजेरी लावली. मान्यवरांच्या  हस्ते दीपप्रज्वलन करून दिव्यांग बंधनाच्या कट्ट्याला सुरुवात झाली. कोणत्याही कार्याचा प्रारंभ गणरायाच्या प्रार्थनेने होतो म्हणूनच दिव्यांग कला केंद्रातील सर्व विद्यार्थी कलाकारांनी गजानना गजानना या गणरायाच्या आरतीवर ताल धरत अतिशय सुरेख नृत्य सादर करून सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्या मिळवल्या. नृत्यानंतर किरण नाकती यांनी दिव्यांग कला केंद्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांची ओळख मान्यवरांना करून दिली. प्रत्येकाच्या अंगी असलेल्या विविध गुणांचं दर्शन त्यावेळी  उपस्थितांना लाभले. विजय जोशी याने नाच रे मोरा गाणं, पार्थ खडकबाण  याने शाहरुखची स्टाईल दाखवीत, आरती गोडबोले व ऋतुजा गांधीने नृत्य व गाणं , संकेत भोसले, अन्मय मेत्री , गौरव राणे, अपूर्वा दुर्गुळे, भूषण गुप्ते, जान्हवी कदम, निशांत गोखले या सर्वानी आपल्या नृत्यातून,  अविनाश मुंगसे यांनी स्वतः काढलेल्या चित्रांतून आपल्या कामाने ओळख करून दिली. प्रवास दिव्यांग कला केंद्राचा या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून आजवरच्या दिव्यांग कला केंद्रातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख दाखविताना नृत्यप्रशिक्षण, गायन, हस्तकला, निवेदन, झाडांची लागवड, चित्रकला, जलतरण स्पर्धेतील यश, नृत्यस्पर्धेत मिळवलेल यश, सण ,उत्सव एकत्रितपणे साजरे केल्याचा प्रवास ,दहीहंडी, होळी, दिव्यांग बंधन, दिव्यांग पहाट व असे अनेक महत्वपूर्ण कार्यक्रम, दिव्यांग धम्माल नावाचा मनोरंजनात्मक कार्यक्रम, टी व्ही नाईन न्यूज चॅनलवर साजरा केलेला चिल्ड्रन्स डे अशा अनेक गोष्टींचा प्रवास व या सर्वच गोष्टींमुळे विद्यार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत असणारा आत्मविश्वास प्रकर्षाने दिसून येत होता व खरंच महाराष्ट्रातल हे एकमेव असं केंद्र आहे जिथे दिव्यांग मुलांना सामान्य मुलांसारखा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. व प्रत्येकाच्या असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळतोय. या डॉक्युमेंट्री नंतर पुन्हा वेशभूषा बदलून याच मुलांनी या “कोळीवाड्याची शान आई तुझं देऊळ” या कोळीनृत्यावर अतिशय सुरेख असं नृत्य सादर केले. त्यानंतर जुन्या हिंदी गाण्यांचे मिश्रण असलेला “रोबो डान्स” सादर करून तर उपस्थित प्रेक्षकांना आपल्या गुणवत्तेची एक वेगळी  झलक दाखवून दिली. त्यानंतर थेट रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी रंगीबिरंगी राखी लेके आई बहना या जुन्या हिंदी गाण्यावर थिरकत रक्षाबंधनाचा प्रसंग उभा केला. गाणं सुरु असतानाच मान्यवरांना रंगमंचावर पाचारण करण्यात आले. दिव्यांग कला केंद्रातील मुलींनी  प्रविण पवार या कर्तव्य दक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या  मनगटावर आपलं संरक्षण करण्यासाठी राखी  बांधली  व उपस्थित सर्वच प्रेक्षक भावुक झाले. आपल्या सर्वांची रक्षा करणारे पोलीस आपल्याला सदैव सुरक्षित ठेवणारे पोलीस आज त्यांच्या सोबत भावा बहिणीचं नातं या दिव्यांग बंधन कार्यक्रमातून सर्व विद्यार्थ्यामध्ये नवी उमेद निर्माण करणार  होत. संजय यादव, दिग्दर्शक निशिकांत सदाफुले यांना सुद्धा रक्षाबंधन करण्यात आले. तसेच ओवाळणी म्हणून  प्रविण पवार यांच्या हस्ते सर्व मुलांना आकर्षक अशी बक्षिसे देण्यात आली. प्रसंगी मिसेस इंडिया स्पर्धेत एकूण तीस हजार स्पर्धांपैकी एकूण ७२ अंतिम स्पर्धकांपैकी प्रथम क्रमांक पटकावून मिसेस इंडिया महाराष्ट्र हा 'किताब पटकावलेल्या निहारिका निशिकांत सदाफुले यांचा सत्कार अभिनय कट्ट्यातर्फे करण्यात आला. तसेच त्यांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थी मुलांना राख्या बांधण्यात आल्या. दिव्यांग कला केंद्राचे शिव धनुष्य लीलया पेलणाऱ्या केंद्र प्रमुख  संध्या नाकती, मीना महाजन, परेश दळवी, वीणा टिळक व वैशाली पवार या सर्वांच अभिनंदन व सत्कार निहारिका सदाफुले यांच्या हस्ते करण्यात आला. अभिनय कट्टा बालसंस्कार शास्त्रातील बालकलाकारांनी “नारळी पुनवचा सण आयला” या कोळीगीतावर अतिशय प्रभावी नृत्य सादर केले. माझ्या आजवरच्या २५ वर्षाच्या पोलीस कारकिर्दीत असा दिव्यांग मुलांचा कार्यक्रम मी बघितला नाही असं म्हणत मुलांकडून असं उल्लेखनीय काम करणाऱ्या दिव्यांग कला केंद्राचं भरभरून कौतुक प्रविण पवार यांनी केलं. माझ्या सारख्या शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा या सर्व मुलांकडून भरपूर ऊर्जा मिळाली आहे व या मुलांमध्ये संवेदना जिवंत असल्याचं सांगत या मुलांची प्रत्येक गोष्ट नैसर्गिक असल्याचे संजय यादव यांनी नमूद केले. दिव्यांग बंधनाच्या या कार्यक्रमात सर्वच उपस्थित प्रेक्षक सुद्धा सहभागी झाले व खऱ्या अर्थाने आम्हा सर्व ठाणेकरांना अभिमान वाटेल  असा उपक्रम किरण नाकती व ठाणे महानगर पालिका करतेय असं मत एका ज्येष्ठ प्रेक्षक प्रतिनिधींने व्यक्त केले. या कार्यक्रमाचे निवेदन माधुरी कोळी यांनी केले.

Web Title: "Divyang Bandhan" program ends in acting in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.