नव्या खाडीपुलामुळे कोंडी वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:09 AM2018-01-17T01:09:23+5:302018-01-17T01:09:23+5:30
ठाणे कळवा खाडीवर उभारण्यात येणाºया तिसºया पुलाचे काम आता मार्गी लागत असले तरी हा पूल जेथे उतरत आहे तेथून पुढे असलेल्या विटावा बोगद्याच्या चिंचोळ्या मार्गामुळे
ठाणे : ठाणे कळवा खाडीवर उभारण्यात येणाºया तिसºया पुलाचे काम आता मार्गी लागत असले तरी हा पूल जेथे उतरत आहे तेथून पुढे असलेल्या विटावा बोगद्याच्या चिंचोळ्या मार्गामुळे पुन्हा कोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे. घोडबंदर मार्गावरील पूल जेथे संपतात व नवा पूल सुरु होतो त्या जंक्शनपाशी वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा फटका वाहन चालकांना बसतो आहे. त्यामुळे ठाणे-कळवा खाडीवरील पुलाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच यावर तोडगा काढावा, अशी आशा आहे.
मुंबईतील सी लिंकच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने विटावा पुलाखालील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी या कळवा खाडी पुलावर तिसरा नवीन पुलाच्या कामाचा प्रस्ताव जानेवारी २०१२ मध्ये मांडला होता. सध्या कळवा खाडीवर एक ब्रिटीशकालीन आणि आणखी एक पूल आहे. परंतु ब्रिटीशकालीन पूल कमकुवत झाल्याने त्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दुसºया पुलावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. हा दुसरा पूल वाहतुकीसाठी कमी पडू लागल्याने पालिकेने तिसºया पुलाचा पर्याय मांडला. महापालिकेने २०११-१२ या आर्थिक वर्षात यासाठी १० कोटींची तरतूद केली होती. आता या पुलासाठी १८३ कोटींचा खर्च केला जाणार आहे.
जुन्या दोन पुलांच्या बाजूलाच मात्र त्यांच्यापेक्षा थोड्या उंचीवर हा पूल उभारण्यात येणार आहे. ठाण्याकडून विटाव्याकडे जाण्यासाठी हा वन-वे पूल असणार आहे तर विटाव्याकडून येणाºया वाहनांसाठी जुन्या पुलाचा पर्याय उपलब्ध आहे. या तिसºया पुलामुळे येथील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. ठाण्याकडून खारेगांव (मनिषा नगर) आणि विटाव्याच्या पुढे म्हणजेच ठाणे - बेलापूर दिशेला असा दोनही मार्गाने हा पूल खाली उतरणार आहे. तसेच कळव्याकडून ठाण्याकडे येतांना हा पूल साकेत, जेल तलाव आणि कोर्टनाका मार्गे ठाणे स्टेशनकडे खाली उतरणार आहे. आता यात थोडा बदल केला असून, आत्माराम चौकापर्यंत रस्ता या पुलाला जोडण्यात येणार आहे.