तीन दिवशीय संपामुळे ठाणे जिल्ह्यात १०० कोटींची वसुली रखडल्याचा फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 08:30 PM2018-08-09T20:30:31+5:302018-08-09T20:36:27+5:30

शंभर कोटीं रूपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनात आले. यामध्ये प्रामुख्याने सेल टॅक्स विभागाचे दर दिवसाचे सुमारे २५ कोटी रूपयांच्या वसुलीचे काम बुडाले. तीन दिवसात ७५ कोटींच्या वसुलीस राज्य शासनास मुकावे लागल्याचे येथील नेत्यांच्या चर्चेतून उघड झाले. याप्रमाणेच आरटीओचे होणारे सुमारे १६ कोटींची वसुली तीन दिवसात बुडाली. तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाचे सुमारे साडे तीन कोटींची वसुली या संपाच्या कालावधीत बुडाली

 Due to the three-day strike, 100 crore rupees recovering in Thane district! | तीन दिवशीय संपामुळे ठाणे जिल्ह्यात १०० कोटींची वसुली रखडल्याचा फटका !

ठाणे जिल्ह्यातील महसूल विभागासह आरटीओ, सेलटॅक्स आदी महत्वाच्या विभागांतील सुमारे शंभर कोटी रूपये वसुली रखडल्याचा आंदाज

Next
ठळक मुद्देअभियांत्रिकी महाविद्यालयील प्राध्यापकांचा देखील या संपात सहभाग त्यांनी माणुसकीच्या नात्याने सेवा दिली. पालक मिटींग घेतली. विद्यार्थ्यांचे डेमो लेक्चर घेतलेशिक्षकांचा दोन दिवस सहभाग जाणला नाही. परंतु तिस-या दिवशी त्यांनी पाठिंबा दर्शवण्याचा प्रयत्न केला. पण मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामुळे त्याचा फज्ज्या उडाला.


सुरेश लोखंडे
ठाणे : शासनाच्या सर्व कार्यालयांमधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरीय तीन दिवशीय संपात सहभाग घेऊन एकजूट दाखवली. राज्य शासनाच्या सततच्या हेकेखोर ठाणे जिल्ह्यातील महसूल विभागासह आरटीओ, सेलटॅक्स आदी महत्वाच्या विभागांतील सुमारे शंभर कोटी रूपये वसुली रखडल्याचा आंदाज, या संपाचा मुळ केंद्रबिंदू ठरलेल्या येथील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर गव्हाळे यांनी सांगितले.
या संपाच्या कालावधीत जिल्ह्यातील तीन प्रमुख कार्यालयाशी संपर्क साधून या तीन दिवसाच्या नुकसानीचा आंदाज घेतला. त्यात शंभर कोटीं रूपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनात आले. यामध्ये प्रामुख्याने सेल टॅक्स विभागाचे दर दिवसाचे सुमारे २५ कोटी रूपयांच्या वसुलीचे काम रखडले. तीन दिवसात ७५ कोटींच्या वसुली रखडली. याप्रमाणेच आरटीओची सुमारे १६ कोटींची वसुली रखडल्याचा तीन दिवसाचा  फटका  . तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाचे सुमारे साडे तीन कोटींची वसुली या संपाच्या कालावधीत रखडले आहे. उर्वरित अन्य काही कार्यालयांच्या छोठ्या मोठ्या रकमेच्या वसुलीचा विचार करता जिल्ह्यात शंभर कोटींचा अंदाज निश्चित करण्यात आला.
जिल्ह्याभरातील सुमारे साडे चार हजार कर्मचा-यांनी या संपात सहभाग घेतला. प्रारंभ राजपत्रित अधिका-यांचा सहभागी असल्याचे कळताच कर्मचा-यांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण होते. परंतु त्यांनी या लढ्यातून माघार घेतल्यामुळे काहीसे तहबल झालेल्या संघटनेच्या नेत्यांनी पहिला दिवस यशस्वी केला आणि त्यानंतरचे पुढील दोन दिवस विना दिक्कत कर्मचा-यांचा प्रतिसाद मिळाल्याचे गव्हाळे यांच्यासह चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रदिप मोरे यांच्यासह प्राची चाचड, स्मिता टक्के यांनी सांगितले. अधिका-यांशिवाय हा लढा जिंकून मागण्या मंजूर करून घेतल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले.
संपाच्या या तीन दिवसाच्या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नंतरची अस्थापना असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेने केवळ एक दिवस संपात सहभाग नोंदवला. तर जिल्हाधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभाग, नगररचना, शिधावाटप आदींमध्ये शुकशुकाट होता. अभियांत्रिकी महाविद्यालयील प्राध्यापकांचा देखील या संपात सहभाग होता. पण विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा कालावधी लक्षात घेऊन त्यांनी माणुसकीच्या नात्याने सेवा दिली. पालक मिटींग घेतली. विद्यार्थ्यांचे डेमो लेक्चर घेतले. एवऐच नव्हे तर व्दितीय व तृतिय वर्षाच्या पदवी व पदविका विद्यार्थ्यांचे तिन्ही दिवस लेक्टचर घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळले. मात्र या कालावधीत दुपारच्या सुटीत त्यांनी व्दारेसभा घेऊन संपातील सहभाग नोंदवला.
जिल्ह्यातील बहुतांशी शिक्षकांचा या संपाला पाठिंबा मिळाला. पण जिल्ह्यातील शिक्षकांच्या दोन्ही मोठ्या संघटना भाजपा व सेनेच्या पाठबळाच्या असल्यामुळे त्यांच्या शिक्षकांचा दोन दिवस सहभाग जाणला नाही. परंतु तिस-या दिवशी त्यांनी पाठिंबा दर्शवण्याचा प्रयत्न केला. पण मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामुळे त्याचा फज्ज्या उडाला. खबरदारीची उपाययोजना म्हणून शिक्षण विभागाने शाळांना सुटी जाहीर केल्यामुळे त्यांच्या शेवटच्या दिवसाच्या पाठिंब्यावर पाणी फिरल्याचे आढळून आले.

Web Title:  Due to the three-day strike, 100 crore rupees recovering in Thane district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.