स्वत:बरोबर इतरांनाही व्यवसाय करण्यास प्रोत्साहन करावे - मराठी उद्योजकांचा कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 04:21 PM2018-02-28T16:21:54+5:302018-02-28T16:21:54+5:30

मनविसेचे ठाणो शहर अध्यक्ष संदिप पाचंगे यांनी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मराठी तरु णांनी उद्योजक व्हावे या हेतूने ठाणो शहरातील मराठी यशस्वी उद्योजकांमार्फत नवीन तसेच स्वत: व्यवसाय करणा:या मराठी व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धीसंदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.

Encourage others to do business with yourself - The advice of Marathi entrepreneurs | स्वत:बरोबर इतरांनाही व्यवसाय करण्यास प्रोत्साहन करावे - मराठी उद्योजकांचा कानमंत्र

स्वत:बरोबर इतरांनाही व्यवसाय करण्यास प्रोत्साहन करावे - मराठी उद्योजकांचा कानमंत्र

Next
ठळक मुद्देमराठी माणसाने उत्तमातोत्म व्यवसाय करावामार्गदर्शन शिबिराचे आयोजनअमित ठाकरे देखील उपस्थित

ठाणे : मराठी माणूस हा चांगला उद्योजक घडला पाहिजे. मराठी माणसाने उत्तमातोत्म व्यवसाय करावा. तुम्ही स्वत: व्यवसाय करा आणि तुमच्या मित्रांनाही व्यवसाय करण्यास प्रोत्साहन द्या असा सल्ला मराठी उद्योजकांनी मराठी तरुणांना दिला. यावेळी त्यांनी मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे, ती टिकली पाहिजे, आपल्या मातृभाषेला कमी समजू नका असाही कानमंत्र दिला. या कार्यक्रमाला अमित ठाकरे देखील उपस्थित होते. मनविसेचे ठाणे शहर अध्यक्ष संदिप पाचंगे यांनी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मराठी तरु णांनी उद्योजक व्हावे यासाठी शहनाई हॉलमध्ये मंगळवारी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.

      लोकमत, ठाणेचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान म्हणाले की, मराठी भाषेवरचे प्रेम हे भ्रष्टाचाराविरोधी लढाई सारखे आहे. मराठी भाषा दिन सोडला तर त्याव्यतिरिक्त आपण किती मराठीचा वापर करतो असा सवाल उपस्थित करीत ते म्हणाले की, आपण मराठी बद्दल प्रेमाने बोलतो पण कृती करीत नाही. मराठी माणसाने मराठी माणसालाच प्राधान्य दिले पाहिजे. जोपर्यंत मराठी भाषा ही ज्ञानाची, पोट भरण्याची भाषा होत नाही तोपर्यंत तिला महत्त्व प्राप्त होत नाही. मराठी व्यावसायिकांनी त्यांचा निधी मराठी भाषेसाठी काम करणाºया संस्थांना देण्याचे आवाहन प्रधान यांनी केले. जोपर्यंत समाजातून भाषा विकास होणार नाही, इंग्रजीला पयार्यी शब्द निर्माण होणार नाही तोपर्यंत भाषा विकसीत होणार नाही असेही ते म्हणाले. मराठी भाषेचा दिवस साजरा करणे म्हणजे काव्यवाचन, साहित्यिक कार्यक्रम यापलिकडे काही कार्यक्रम करावे हे मानले जात नाही अशी खंत मराठी अभ्यास केंद्राचे आनंद भंडारे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, १३ हजार मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मराठी भाषा जगली पाहिजे असे ज्यांना वाटते त्यांनी मराठी शाळा टिकली पाहिजे यासाठी आग्रह धरावा. स्वत:बरोबर आपल्या मित्रांनाही व्यवसाय करण्यास उद्युक्तकरा, व्यवसाय करताना रिस्क ही घेतलीच पाहिजे असे सांगत शेअर मार्केट तज्ञ शशांक रावले यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. ठाणे जनता सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश उतेकर म्हणाले की, व्यवसाय करण्यासाठी बिझनेस प्लॅनिंग असणे महत्त्वाचे आहे. बँकेतून कर्ज घ्यायला घाबरु नका, कर्ज घेतल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. कर्ज हे स्वत:च्या पैशापेक्षा जास्त स्वस्त असते. बँकांमध्ये कर्जाच्या सवलती आहेत त्याचा लाभ घ्या असे मार्गदर्शन त्यांनी केले. मनसे, महाराष्ट्र राज्य सचिव प्रमोद पाटील म्हणाले की, उद्योजक होणे याच्यात ज्या यातना आहे त्या यातनांचा विचार करुनच मराठी माणसाला भिती वाटते. परंतू उत्तमोत्तम व्यवसाय करा असा सल्ला त्यांनी दिला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नंदकुमार पावस्कर यांनी स्वानुभव सांगत मार्गदर्शन केले.
राजभाषा चित्रपटाचे ज्ञानेश्वर मर्गज म्हणाले की, मराठी राजभाषा दिन ३६५ दिवस असतो, आजचा दिवस हा जागतिक मराठी राजभाषा दिन आहे. मराठी भाषेची चळवळ ती त्या भाषेची ताकद काय आहे हे सांगून वाढते. मराठी भाषेची आपल्याला गरज आहे तिला आपली गरज नाही. मराठी माणूस मरेल पण मराठी भाषा मरणार नाही. मातृभाषा डोळ््यांनी वाचायला शिकविते. छत्रपती शिवाजी महाराज हे उद्योगपती होते, त्यांचा आदर्श डोळ््यांसमोर ठेवा. मराठी भाषा जिवंत आहे आणि ती जिवंत राहील. कवी आदित्य दवणे म्हणाले की, व्यवसायात संधी साधू असणे महत्त्वाचे आहे. सर्व उद्योजक एकत्र आले तर मराठी शाळांना जीवनदान मिळेल. यावेळी हॉटेल मालक किरण भिडे, औषध व्यावसायीक संजय धनावडे, ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, वृत्तपत्र व्यावसायिक, पत्रकार निखिल बल्लाळ व इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेंद्र बेडेकर यांनी केले.
 

Web Title: Encourage others to do business with yourself - The advice of Marathi entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.