राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत ठाण्याचा मयंक चाफेकर ठरला वेगवान जलतरणपटू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 07:12 PM2017-12-22T19:12:11+5:302017-12-22T19:22:11+5:30
ठाण्यातील खेळाडू विविध स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहेत. त्यातच,त्यांनी आता जलतरण स्पर्धेत ही असा ठसा उमठवला आहे. राज्यस्तरीय स्पर्धा ठाण्यातील खेळाडू गाजवताना दिसत आहे.
ठाणे : मालवण येथे १७ डिसेंबर रोजी झालेल्या आठव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत सलग तीन वर्षे ठाण्यातील मयंक चाफेकर याने पाच किमी प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. हे अंतर त्याने या वर्षी अवघ्या ४७ मिनिटांत पार करत वेगवान जलतरणपटूचा किताब पटकावला आहे. त्याचबरोबर त्याने गतवर्षातील विक्रम एक मिनिटाने मागे टाकून नवीन विक्रमाला गवसणी घातली. तर, स्टारफिशने या स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली.
एकूण १० गटांत ही स्पर्धा पार पडली. या वेळी २९ जिल्ह्यांतून एकूण १२३० जलतरणपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिशच्या जलतरणपटूंनी हॅट्ट्रिक साधून विजेता चषक पटकावला. याचबरोबर विविध गटांमध्ये १० जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी करत ४ सुवर्ण, २ कांस्यपदकांची कमाई केली. ५ किमी सागरी जलतरण स्पर्धेत मयंक चाफेकर याने प्रथम क्र मांकासह सुवर्णपदक, तर जय एकबोटे यांनी तृतीय क्र मांकासह कांस्यपदक जिंकले. ३ किमी स्पर्धेत यश सोनक व सानिका तापकीर यांनी चतुर्थ क्र मांक पटकावला. २ किमी स्पर्धेत वेदान्त गोखले याला आठव्या क्र मांकावर समाधान मानावे लागले. १ किमी स्पर्धेत सवर अकुसकर हिने प्रथम क्र मांकासह सुवर्णपदकावर नाव कोरले. तर, नील वैद्य याने प्रथम क्र मांकासह सुवर्णपदकाची कमाई केली. ५०० मीटर स्पर्धेत आदित्य घाग याने प्रथम क्र मांकासह सुवर्णपदक तर परीन पाटील याने तृतीय क्र मांकासह कांस्यपदक पटकावले, तर आयुषी आखाडे ही पाचव्या क्र मांकावर राहिली. तसेच अथर्व पवार, अपूर्व पवार, वरद कोळी, मुक्ता काळे, सई डिंगणकर, मीर वीरा, अॅरिनी शहा, प्राश्मी गाला, रियान नरोटे, ईशा शिंदे, साची अहिरे, मिहिका सुर्वे, गौरी नाखवा, आर्यन डोके, सर्वेश डोके, अनीष चव्हाण, सोहम साळुंखे, सोहम सोनावणे, पृथ्वीराज कांबळे, अरीन नरोटे, सिद्धान्त पोळ, ऋ तुजा पोळ, ओम जोंधळे, हर्ष पाटील, मानव मोरे, गार्गी शिटकर, विजय ओजाळे, वैभव नाखवा, प्रशांत साळुंखे आदी ४० जलतरणपटूंना प्रशिक्षक कैलास आखाडे, नरेंद्र पवार तसेच ठामपा उपायुक्त संदीप माळवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, वसई-विरार महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांचे मार्गदर्शन लाभले.