नोंदणी प्रमाणपत्र नसलेल्या महिला व बालविकास संस्थांवर गुन्हे दाखल करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 06:53 PM2017-10-03T18:53:09+5:302017-10-03T18:53:20+5:30

Filing of complaints against women and child development institutions without registration certificate | नोंदणी प्रमाणपत्र नसलेल्या महिला व बालविकास संस्थांवर गुन्हे दाखल करणार

नोंदणी प्रमाणपत्र नसलेल्या महिला व बालविकास संस्थांवर गुन्हे दाखल करणार

Next

ठाणे दि  - नोंदणी प्रमाणपत्राशिवाय काम करणाऱ्या महिला व बालविकास संस्थांवर कायद्याप्रमाणे दुन्हां दाखल करण्यात येईल, यात १ वर्षापर्यंत तुरुंगवास आणि १ लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे त्यामुळे अशा संस्थांनी तातडीने नोंदणी प्रमाणपत्रासाठी जिल्हा महिला व  बालविकास अधिकारी कार्यालय, दुसरा मजला, नियोजन भवन , जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व  बालविकास अधिकारी अजय फडोळ यांनी केले आहे.

महिला व बाल विकास क्षेत्रात कार्यरत सर्व स्वयंसेवी संस्थां आणि व्यक्ती यांच्यासाठी केंद्र शासनाने सप्टेंबर २०१६ पासून आदर्श नियमावली लागू केली आहे. ती सर्व अनुदानित, विना अनुदानित , श्साकीय व अशासकीय संस्था याना लागू आहे. या संस्थाकडे नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. बालकांच्या काळजी व संरक्षणाकरिता कार्यरत संस्थांनी बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ मधील कलम ४१ नुसार प्रस्ताव विहित नमुन्यात भरून कागदपत्रांसह त्वरित सादर करावेत अन्यथा अशा संस्थांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल असेही कळविण्यात येते

Web Title: Filing of complaints against women and child development institutions without registration certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा