...अखेर पोलिसांना हक्काची घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:02 AM2018-12-12T00:02:00+5:302018-12-12T00:03:20+5:30
१७ वर्षे दिला लढा; पोलीस महिला मंडळाच्या पाठपुराव्याला यश
ठाणे : वर्तकनगर येथील म्हाडाच्या धोकादायक इमारतींमधील ३४० पोलीस कुटुंबियांना पुनर्बांधणीत हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेली १७ वर्षे यासाठी लढा देणाऱ्या येथील जनसेवा महिला मंडळाने आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वखाली गेली चार वर्षे पोलीस आयुक्त ते मुख्यमंत्री असा यशस्वी पाठपुरावा केला होता.
वर्तकनगर येथील म्हाडाच्या ५८ ते ६१,५१ ते ५३ तसेच १४ आणि १६ अशा दहा इमारतींमध्ये पोलिसांची ३४० कुटूंबे याठिकाणी वास्तव्याला आहेत. या इमारती ४० वर्षे जुन्या असून त्या धोकादायक असल्याचे ठाणे महापालिकेने जाहीर केले आहे. गेली काही वर्षे ही कुटुंबे जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर या कुटूंबांना ही घरे पोलीस प्रशासनाकडे परत द्यावी लागतात. त्यामुळे प्रामाणिकपणे सेवा बजावणारे पोलीस आणि त्यासाठी त्याग करणारे कुटुंब बेघर होतात. या कुटुंबांना तात्पुरती घरे न मिळता हक्काची घरे मिळावीत, यासाठी येथील जनसेवा महिला मंडळ गेली १७ वर्षे शासनाकडे मागणी करीत होते.
या महिला पदाधिकाºयांनी केळकर यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन पोलीस आयुक्त विजय कांबळे तसेच सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित यांची भेट घेऊन मालकी हक्काच्या घरांबाबतच्या विषयाचे गाºहाणे मांडल्यामुळे या मागणीला चालना मिळाली. तत्कालीन गृहसचिव के.पी.बक्षी यांच्याशीही मंडळाने भेट घेऊन चर्चा केल्यानंतर त्यांनीही या मागणीला हिरवा कंदील दिला होता. पुनर्बांधणीत सेवानिवृत्त आणि मृत पावलेल्या कर्मचाºयांच्या कुटूंबियांना प्राधान्याने घरे देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानंतर केळकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचे मंडळाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. त्यावेळी या कुटुंबांना मालकी हक्काची घरे देण्याची खात्री त्यांनी दिली. त्याप्रमाणे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पोलीस गृहनिर्माण मंडळास ठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याप्रमाणे पोलीस महासंचालकांच्या दालनात २०१७-२०१८ मध्ये तीन बैठका झाल्या. त्यानुसार २.५ एफएसआय देण्याचे ठरले.
दरम्यान, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांची नुकतीच भेट घेवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली असून पोलीस खात्याने मान्यता दिली तर म्हाडा पुनर्विकास करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. अंतिम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या स्तरावर संबंधित खात्याची बैठक घेण्याबाबत विनंतीपत्र दिलेले असून लवकरच बैठक घेण्याचे त्यांनी मान्य केल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले.
आ. केळकरांचेही सहकार्य
पोलिसांच्या मागणीला ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळेही यश आले आहे. केळकर यांनी नियमितपणे पाठपुरावा करु न पोलिसांना हक्काची घरे मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकारी महिलांनी दिली.