अग्निशमन एनओसी : ठाण्यातील आणखी १३ हॉटेल झाली सील  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 07:27 AM2018-03-05T07:27:04+5:302018-03-05T07:27:04+5:30

सहा महिन्यांपासून वारंवार नोटिसा देऊनही आगप्रतिबंधक उपाययोजना न करणाºया ८६ हॉटेल आणि बारपैकी १३ हॉटेल ऐन रविवारी सील करण्याची कारवाई अग्निशमन दलाने केली. नियमांचे उल्लंघन करणाºया अशा हॉटेलांवर कारवाई करण्याचे आदेश शनिवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीच पालिका प्रशासनाला दिले होते.

 Fire Fighting NOC: More 13 Hotels in Thane Seal | अग्निशमन एनओसी : ठाण्यातील आणखी १३ हॉटेल झाली सील  

अग्निशमन एनओसी : ठाण्यातील आणखी १३ हॉटेल झाली सील  

Next

ठाणे - सहा महिन्यांपासून वारंवार नोटिसा देऊनही आगप्रतिबंधक उपाययोजना न करणाºया ८६ हॉटेल आणि बारपैकी १३ हॉटेल ऐन रविवारी सील करण्याची कारवाई अग्निशमन दलाने केली. नियमांचे उल्लंघन करणाºया अशा हॉटेलांवर कारवाई करण्याचे आदेश शनिवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीच पालिका प्रशासनाला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
यापूर्वीही अनधिकृत बार, हॉटेल, हुक्का पार्लरवर पालिकेतर्फे कारवाई करण्यात आली होती. मुंबईतील कमला मिलच्या घटनेनंतर आग प्रतिबंधक यंत्रणेचा मुद्दा चर्चेत आल्याने त्यावर कारवाई सुरू झाली.
आगप्रतिबंधक उपाययोजना न केल्याने अग्निशमन दलाने ठाणे शहरातील ४२६ हॉटेल, बार, लाउंज यांना ‘ना-हरकत दाखला’ दिलेला नाही. त्यामुळे त्यांना सप्टेंबर २०१७ पासून फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ठाणे अग्निशमन दलाने त्यांची पूर्तता करण्यासाठी वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या.
मात्र, अनधिकृत इमारतींमध्ये असूनही ज्यांनी आगप्रतिबंधक उपाययोजनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, अशी ८६ हॉटेल, बार, लाउंज तीन दिवसांत सील करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. या आदेशानंतर २४ तासांच्या आतच मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्या पथकाने रविवारी हॉटेल टायटॅनिक (कळवा), हॉटेल एव्हरी डे अंडे (नौपाडा), हॉटेल म्युनो (कोठारी कम्पाउंड), हॉटेल ७० डिग्री (कोठारी कम्पाउंड), हॉटेल रेनबो बार (बाळकुम नाका), हॉटेल एक्स झोन (वाघबीळ), हॉटेल गोल्डन फास्ट फूड (कोपरी), हॉटेल लजीज फूड जंक्शन (कोपरी), हॉटेल हादिया, हॉटेल कौसर (कौसा-मुंब्रा), हॉटेल देवीदर्शन (रघुनाथनगर), हॉटेल फुकरे ( फ्लॉवर व्हॅली) आदी १३ हॉटेल सील केली. या कारवाईने हॉटेलमालकांचे चांगलेच धाबे दणाणले असून कारवाई टाळण्यासाठी उरलेल्यांची अजूनही धावपळ सुरू आहे.

२६० प्रकरणे शहर विकास विभागाकडे

च्जवळपास ८० हॉटेलमालकांनी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून हॉटेलमध्ये अग्निशमन यंत्रणा सक्षम असल्याचा दावा केला. त्यानंतर त्यांच्या दाव्याची तपासणी करून घेण्यात आली. ज्यांची यंत्रणा योग्य नव्हती, त्यांच्यावर कारवाई झाली.

च्जी हॉटेल अधिकृत इमारतीमध्ये नाहीत, परंतु त्यांनी आगप्रतिबंधक उपाययोजनांच्या नियमांची पूर्तता केली आहे, अशी २६० प्रकरणे शहर विकास विभागाकडे नियमित करण्याच्या कार्यवाहीसाठी सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अधिकृत आणि अनधिकृत अशा दोन्ही ठिकाणच्या हॉटेलांमध्ये आगप्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत की नाही, याची तपासणी केली जात आहे. अनधिकृत आहेत, पण उपाययोजना करणाºया २६० हॉटेलमालकांना कम्पाउंडिंग दंडआकारणी करून त्यांची हॉटेल नियमित केली जातील. ती प्रकरणे शहर विकास विभागाकडे देण्यात आली आहेत. पण, ज्यांनी कोणत्याच अटींचे पालन केलेले नाही, त्यांना मात्र कोणतीही दया न दाखवता ही कारवाई केली जाणार आहे.
- शशिकांत काळे, मुख्य अग्निशमन अधिकारी

Web Title:  Fire Fighting NOC: More 13 Hotels in Thane Seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.