शहरातील फटाके विक्रेत्यांना यंदा कुठेही स्टॉल लावता येणार, कोपरीचे फटाके विक्रेतेही येणार अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 08:07 PM2017-10-11T20:07:44+5:302017-10-11T20:07:54+5:30
दरवर्षी दिवाळीच्या काही दिवस फटकांचे स्टॉल लावणा-या तात्पुरत्या स्वरुपातील फटाके विक्रेत्यांना यंदा मात्र शहरात कुठेही स्टॉल लावता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे : दरवर्षी दिवाळीच्या काही दिवस फटकांचे स्टॉल लावणा-या तात्पुरत्या स्वरुपातील फटाके विक्रेत्यांना यंदा मात्र शहरात कुठेही स्टॉल लावता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने हा निर्णय घेतला असून उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणीचे कारण त्यांनी पुढे केले आहे. त्यातही तात्पुरत्या स्वरुपातील फटाके विक्रेत्यांबरोबरच जुन्या फटाके विक्रेत्यांना देखील यंदा ना हरकत प्रमाण देण्यात येणार नसल्याचा निर्णय या विभागाने घेतला आहे. त्यामुळे कोपरीत मागील कित्येक वर्षापासून होलसेल भावात फटक्यांची विक्री करणा-या दुकानदारांवर देखील यामुळे गडांतर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
रस्त्यावर, फुटपाथवर कोणत्याही स्वरुपाची जिवीत अथवा वित्ता हानी होऊ नये म्हणून पालिकेने गेल्या काही वर्षापासून रस्त्यावर आणि फुटपाथवर फटाक्यांचे स्टॉल लावण्यास बंदी केली आहे. फटाक्यांचे स्टॉल लावायचे झाल्यास, ठाणो महापालिकेची मैदाने, मोकळे भुखंड आदी ठिकाणी अशा प्रकारे स्टॉल लावले जात आहेत. त्यानुसार मागील वर्षी तब्बल 250 च्या आसपास स्टॉल शहरात लागले होते. विशेष म्हणजे यासाठी आकारण्यात येणा:या भाडय़ातही पालिकेने मागील वर्षी वाढ केली होती.
दरम्यान, मंगळवारी उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी फटाके विक्रीला बंदी घातल्याचे आदेश दिल्याने आता तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री करणा:या फटाके विक्रेत्यांवर गडांतर आले आहे. दुसरीकडे ठाणो महापालिकेच्या अग्निशमन विभागाने बुधवारी याबाबत महापालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला असल्याचे समजते. परंतु दुसरीकडे आतार्पयत जे काही अर्ज अग्निशमन विभागाला प्राप्त झाले आहेत, त्यातील एकाही अर्जाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात असल्याचे अग्निशमन विभागाने स्पष्ट केले आहे. त्यातही पोलीस आणि परवाना विभागांना देखील याबाबत सुचना देण्यात आल्याची माहिती अग्निशमन सुत्रंनी दिली आहे.
तात्पुरत्या स्वरुपातील फटाके विक्रेत्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतानाच गर्दीच्या ठिकाणी किंवा निवासी क्षेत्रत जर अशा पध्दतीने फटाक्यांची विक्री होत असेल तर त्यांना देखील ना हरकत प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय देखील या विभागाने घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाचा फटका मागील कित्येक वर्षापासून कोपरी भागात फटाक्यांची विक्री करणा:या दुकानदारांना देखील बसणार असल्याची चित्र निर्माण झाले आहे. या ठिकाणी तर गोडावून असून तेथे फटाके डम्प केले जातात. सुरक्षितेतच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. असे काही मुद्दे मागील कित्येक वर्षापासून उपस्थित झाले असून त्यावर कारवाई करण्याची मागणी देखील वारंवार करण्यात आली आहे. परंतु असे असतांना देखील त्यावर कारवाई मात्र आजतागायत झालेली नाही. त्यामुळे अग्निशमन विभागाने या फटाके विक्रीच्या दुकानांबाबत कितपत लागू होतो हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे.
- अग्निशमन विभागाने ना हरकत प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता पालिकेचा परवाना विभाग आणि पोलीसांकडून या विभागांना परवानगी देण्यात का? याबाबतचा निर्णय मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.