ठाणे जिल्ह्यातील रूग्णाना प्रथमच मिरगी - काकडीचा दुर्मिळ उचार मिळाला मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 08:30 PM2018-11-18T20:30:25+5:302018-11-18T20:42:35+5:30
ठाणे सिव्हील रूग्णालयात आज विविध आजारांवरील उपचारांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची ‘सीएमई’ ही विशेष कार्यशाळा देखील यावेळी घेण्यात आली. यासाठी कर्नाटकातील वेल्लोरे येथील नेरोफिझिएन तज्ज्ञ डॉ. बिंदू मेनोन यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना उपचारासाठीचे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी मनोरूग्णालयातील मिरगी, काकडी येणाऱ्यां रूग्णांसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या डॉक्टरांनी खास आणलेल्या गोरगरीब रूग्णांसह श्रीमंत रूग्णांवर यावेळी मोफत उपचार करण्यात आले
ठाणे : सध्या मिरगी, आकडी (फीट) येण्याचा आजार जीव घेणा ठरत आहे. मात्र आजचा रविवार जिल्ह्यातील या रूग्णांसाठी लाभ दाचक ठरला. या जीव घेण्या आजरांवरील उपचारात विशेष प्राविण्य मिळवलेले तज्ज्ञ डॉ. निर्मल सूर्या यांच्यासह त्यांच्या सुमारे २० डॉक्टरांच्या पथकाने येथील सिव्हील रूग्णालयात येऊन जिल्ह्याभरातील सुमारे १८२ रूग्णांवर रविवारी मोफत दुर्मिळ उपचार करून त्यांचे लाईफ वाढवले. यावेळी राज्याचे आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांची देखील खास उपस्थिती लाभली.
ठाणे सिव्हील रूग्णालयात आज विविध आजारांवरील उपचारांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची ‘सीएमई’ ही विशेष कार्यशाळा देखील यावेळी घेण्यात आली. यासाठी कर्नाटकातील वेल्लोरे येथील नेरोफिझिएन तज्ज्ञ डॉ. बिंदू मेनोन यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना उपचारासाठीचे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी मनोरूग्णालयातील मिरगी, काकडी येणाऱ्यां रूग्णांसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या डॉक्टरांनी खास आणलेल्या गोरगरीब रूग्णांसह श्रीमंत रूग्णांवर यावेळी मोफत उपचार करण्यात आले. राज्य शासनाच्या आरोग्य विभागासह डॉ. निर्मल सूर्या फौंडेशन आणि सिव्हील रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील विविध कार्यक्रम पार पडले.
जिल्ह्यतील पल्स पोलिओ मोहिमेला देखील आजपासून प्रारंभ झाला. त्यानिमित्त आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांच्या हस्ते बालकांस पल्स पोलिओ डोस देण्यात आला. या वेळी आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड, प्रादेशीक मनोरूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय बोदडे, सिव्हील सर्जन कैलास पवार, डॉ. पी. डी. देशमुख, डॉ. पवार मॅडम, डॉ. अविनाश भागवत आदी तज्ज्ञ डॉक्टरांसह जिल्ह्यातील महापालिकांसह सर्व रूग्णालयांचे वैद्यकीय डॉक्टरांनी येथील विशेष कार्यशाळेचा लाभ घेतला. यावेळी जिल्ह्यातील शेकडो डायबेटीस, ब्लड प्रशेरच्या रूग्णांवरही उपचार झाले. याशिवाय जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सध्या सोप्या औषधोपाचाराचे सखोल मार्गदर्शन यावेळी प्राप्त झाले.