एसटीच्या वातानुकुलीत पाच शिवशाही बसेस अखेर ठाण्यात दाखल
By सुरेश लोखंडे | Published: January 20, 2018 05:26 PM2018-01-20T17:26:24+5:302018-01-20T17:32:18+5:30
ठाणे ते कोल्हापूर या मार्गावर या आधीच वातानुकुलीत एक शिवशाही धावत आहे. त्यात आता पुन्हा दोन बसेसची वाढ केली आहे. मात्र या मार्गावर धावणा-या या बसेस खाजगी मालकीच्या आहेत. एसटीने त्या भाड्याने घेऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. या बसेसवरील चालकही संबंधीत खाजगी ठेकेदार कंपनीचे आहेत
* कोल्हापूरसाठी धावणाºया बसेसला उत्तम प्रतिसाद
* सोमवारपासून ठाणे-बोरिवलीसाठी तीन बसेस
ठाणे : राज्यातील महत्वाच्या शहरांना जवळ करण्यासाठी मागील सुमारे दीड महिन्यांपासून ठिकठिकाणी धावणा-या वातानुकुलित शिवशाही बसेस अखेर ठाणेकरांच्या सेवेसाठी देखील दाखल झाल्या आहेत. पाच बसेस आगारात दाखल झाल्या आहेत. यातील दोन बसेस कोल्हापूरसाठी आधीच धावत असून उर्वरित तीन बसेस ठाणे ते बोरिवली या मार्गावर सोमवारपासून सोडल्या जाणार आहेत.
‘नूतन वर्षात शिवशाही ठाण्यात होणार दाखल’ या मथळ्याखाली लोकमतने २७ डिसेंबररोजी वृत्तप्रसिध्द करून चोखंदळ ठाणेकरांना आधीच सुखद धक्का दिला होता. यानुसार एसटी महामंडळाच्या ठाणे बस आगारसाठी सुमारे १२ ‘शिवशाही’ या वातानुकुलित बसेस मंजूर झाल्या आहेत. सुमारे ५५ सिटरच्या या बसेसपैकी एक बस आधीच कोल्हापूरसाठी एक महिन्यापासून धावत आहेत. आता सध्या पाच बसेस ठाण्यात दाखल आहेत. त्यातील दोन बसेस पुन्हा कोल्हापूरसाठी सुमारे २० दिवसांपासून धावत आहेत. आता उर्वरित तीन बसेस ठाणे ते बोरिवली या मार्गावर सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. घोडबंदर परिसरातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन शिवशाहीच्या या वातानुकुलित बसेस सुमारे २० मिनीटाच्या अंतराने ठाणेहून बोरिवली सोडल्या जाणार आहेत. या मार्गावर दिवसभराच्या कालावधीत सुमारे ११८ फे-या या बसेस करणार आहेत.
ठाणे ते कोल्हापूर या मार्गावर या आधीच वातानुकुलीत एक शिवशाही धावत आहे. त्यात आता पुन्हा दोन बसेसची वाढ केली आहे. मात्र या मार्गावर धावणा-या या बसेस खाजगी मालकीच्या आहेत. एसटीने त्या भाड्याने घेऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. या बसेसवरील चालकही संबंधीत खाजगी ठेकेदार कंपनीचे आहेत. या खाजगी कंपन्यांच्या चालकाना सतत कर्तव्यावर राहावे लागत असल्यामुळे त्यांना आराम मिळत नाही. त्यांची झोप होत नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सुमारे १५ दिवसांपूर्वी लोनावळा येथे गाडी बाजूला लावून झोप घेतली आणि त्यानंतर तो कोल्हापूरच्या वाटेला लागल्याचे वृत्त आहे. मात्र अशी कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही, पण काही लोक नाहक चुकीची माहिती पसरवित आहे. या मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सुतोवाच ठाणे एसटी महामंडळाचे डीसी अविनाश पाटील यांनी लोकमतला सांगितले
...........
कृपया लोकमत इंम्पॅक्ट लोगो वापरावा