महापालिका उभारणार हिरानंदानी भागात पाच टन क्षमतेचे बायोमिथेनेशन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 06:54 PM2018-09-15T18:54:21+5:302018-09-15T18:57:20+5:30

ठाणे महापालिकेने कचऱ्यावर शास्त्रोक्तपध्दतीने प्रक्रिया करुन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पाच - पाच टन क्षमतेचे प्रकल्प हिरानंदानी इस्टेट येथे उभारले जाणार आहेत.

Five-ton capacity biomethanation project in Hiranandani area to be set up by municipal corporation | महापालिका उभारणार हिरानंदानी भागात पाच टन क्षमतेचे बायोमिथेनेशन प्रकल्प

महापालिका उभारणार हिरानंदानी भागात पाच टन क्षमतेचे बायोमिथेनेशन प्रकल्प

Next
ठळक मुद्देया प्रकल्पासाठी २५०० स्क्वेअर मीटर जागा उपलब्ध होणारबायो कंपोस्टींग, बायोमिथेनायझेशन प्रकल्प राबविणार

ठाणे - ओला आणि सुका कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे महापालिकेने शहरातील गृहसंकुलाना आवाहन केले आहे. परंतु पालिकेने सुध्दा या संदर्भात पावले उचलली असून त्यानुसार घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट या भागात ५ टन क्षमतेचे बायोमिथेनेशन व बायो कंपोस्टींग प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या ठिकाणी रिटेनिंग वॉल उभारण्यात येणार असून यासाठी येणाºया खर्चाचा प्रस्ताव येत्या १९ सप्टेंबरच्या महासभेत प्रशासनाने पटलावर ठेवला आहे.
                    ठाणे महापालिका क्षेत्रात होणाऱ्या  कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या अनुषंगाने ठाणे शहरात रोज निर्माण होणारा ओला व सुका कचरा विल्हेवाटीसंदर्भात विभागाने कालबध्द कृतीआराखडा उच्च न्यायालयात सादर केला आहे. शहरात आजच्या घडीला प्रतिदिन ४२५ मेट्रीक टन ओला कचरा व ३७५ मेट्रीक टन सुका कचऱ्याची निर्मिती होत आहे. त्यानुसार ओला कचरा विल्हेवाटीसाठी मिश्र पध्दतीची आखणी पालिकेने केली आहे. त्यानुसार बायो कंपोस्टींग, बायोमिथेनायझेशन व मॅकेनिकल कंपोस्टींगच्या माध्यमातून स्थानिकरित्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
त्यानुसार निर्माण होणाऱ्या  कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट विकेंद्रीत पध्दतीने करण्यासाठी ५ -५ टन क्षमतेचे बायोमिथेन गॅस व बायोकंपोस्टीगंचे प्रकल्प उभारण्यास महासभेने सुध्दा मान्यता दिली आहे. तर या प्रकल्पासाठी रोमा बिल्डरने पालिकेला २५०० स्क्वेअर मीटर जागा दिली आहे. ही जागा खाडीकिनारी असल्याने या जागेवर २.५ मीटर पाणी साचणार आहे व प्रकल्प ४ महिने पाण्याखाली असणार आहे. ही बाब विचारात घेऊन २५०० स्क्वेअर मीटर जागेवर रिटेंनिग वॉल बांधून २.५ मीटर उंची वाढविण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. त्यानुसार यासाठी ७३ लाख २२ हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.



 

Web Title: Five-ton capacity biomethanation project in Hiranandani area to be set up by municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.