मानखुर्दमध्ये पादचारी पूल कोसळल्यानं क्रेन अपघातग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 05:55 PM2018-10-07T17:55:01+5:302018-10-07T22:05:34+5:30

अपघातामुळे वाहतुकीची मोठी कोंडी

foot overbridge and crain collapsed near Vashi Police Naka in thane | मानखुर्दमध्ये पादचारी पूल कोसळल्यानं क्रेन अपघातग्रस्त

मानखुर्दमध्ये पादचारी पूल कोसळल्यानं क्रेन अपघातग्रस्त

Next

मुंबई: मानखुर्द हद्दीत खाडी पूल संपल्यावर पुढील सिग्नलवर असणारा पादचारी पूल काढत असताना दुर्घटना घडली आहे. पादचारी पुलाचं काम क्रेनच्या मदतीनं सुरू होतं. मात्र पुलाचं वजन अधिक असल्यानं क्रेनची क्षमता कमी पडली आणि दुर्घटना घडली. पूल कोसळताच क्रेनचा चालकाकडचा भाग हवेत गेला. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. 

पूल कोसळल्यामुळे सायन-पनवेल मार्गाने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसून, पीडब्ल्यूडी अभियंत्याच्या नियोजनातील अभावामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप होत आहे.

सायन-पनवेल मार्गावर जकात नाक्यालगत मानखुर्द येथे सुमारे दोन वर्षापूर्वी पादचारी पूल उभारण्यात आला होता. परंतु या पुलाला भरधाव ट्रकची धडक बसल्यानंतर वाशीकडे येणाऱ्या मार्गावरील पुलाचा अर्धा भाग काढण्यात आला होता. तेव्हापासून त्या ठिकाणी अर्धवट स्थितीतील पादचारी पूल होता. या पुलाला देखील काही वाहनांच्या धडका बसून तोही पडण्याच्या स्थितीत होता. मात्र, आजवर त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले होते. अखेर पुण्यातील दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी पडण्याच्या स्थितीत असलेल्या या पादचारी पुलाचा भाग हटवण्याचे काम रविवारी हाती घेतले. परंतु पुलाचा भाग काढत असताना योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली नव्हती. दोन्ही बाजूनी पुलाचा भाग मोकळा केल्यानंतर तो खाली पडू नये, याकरिता त्याला क्रेनचा आधार देण्यात आला होता; परंतु एका बाजूने पूल मोकळा करताच क्रेनवर त्याचा भार पडल्याने क्रेन उलटून पूल खाली कोसळला. यामध्ये क्रेन चालकाला दुखापत झाली असून, सुदैवाने जीवितहानी टळली.

या घटनेमुळे सायन-पनवेल मार्गाने मुंबईकडे जाणा:या मार्गावर वाशी प्लाझार्पयत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सदर पादचारी पूल हटवण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यापूर्वी प्रवाशांना माहिती देणो आवश्यक असतानाही, तसे न झाल्याने ऐन वेळी प्रवाशांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. दुपारी घटना घडल्यानंतर संध्याकाळर्पयत पूल व क्रेन हटवण्याचे काम त्या ठिकाणी सुरू होते.

 

Web Title: foot overbridge and crain collapsed near Vashi Police Naka in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.