गोवा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 06:35 AM2017-09-16T06:35:09+5:302017-09-16T06:37:26+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी दुपारी २ वा.च्या सुमारास वहूर गावच्या हद्दीत दोन वाहनांना ट्रकने मागून जोराची धडक दिली, तर एक वाहन या ट्रकच्या मागच्या बाजूस आपटले. अशी चार वाहनांमध्ये धडक बसली.

 Four cars have a strange accident on the Goa highway | गोवा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात  

गोवा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात  

Next

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी दुपारी २ वा.च्या सुमारास वहूर गावच्या हद्दीत दोन वाहनांना ट्रकने मागून जोराची धडक दिली, तर एक वाहन या ट्रकच्या मागच्या बाजूस आपटले. अशी चार वाहनांमध्ये धडक बसली. या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रक सोडून तीन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वहूर गावच्या हद्दीत एका मोटारसायकलस्वाराला वाचवणासाठी ट्रक थांबला. या ट्रकच्या मागून मुंबई दिशेला जाणारी एमएच ४६ एयू ०४२२ कार व त्याच्या मागे एमएच ०३ बीजे १०८८ स्विफ्ट कार थांबल्या. याच दिशेने महाड औद्योगिक वसाहतीतून मुंबईला जाणारा ट्रक क्र. एमएच ४६ एफ ३७६९ हा भरधाव वेगाने येवून पुढे थांबलेल्या स्विफ्ट कारवर मागून आदळला. या धडकेमुळे स्विफ्ट कार व त्यापुढे असलेल्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, यामध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. त्या वेळी तीन गाड्या उभ्या असताना याच दिशेने जाणारी महाड ते माणगाव मॅक्झीमो क्र.एमए ०६ बीएम ५७३३ हिने ट्रकला मागून जोराची धडक दिली. या चार वाहनांच्या अपघातात ट्रकचे कोणत्याही त-हेचे नुकसान झाले नाही. या अपघातानंतर पुढे मोटारसायकलस्वाराला वाचवण्यासाठी थांबलेले ट्रक, तसेच मोटारसायकलस्वार त्या ठिकाणाहून पसार झाले. अपघातानंतर काही वेळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. मात्र, वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघाताच्या ठिकाणी महामार्ग वाहतूक पोलीस, तसेच महाड शहर पोलीस ताबडतोब पोहोचले.

Web Title:  Four cars have a strange accident on the Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात