पॉलिश करण्याच्या नावाखाली सोन्याचे दागिने लंपास

By admin | Published: February 15, 2017 11:28 PM2017-02-15T23:28:31+5:302017-02-15T23:28:31+5:30

पॉलिश करून देण्याच्या नावाखाली दिडे चाळीतील एका वृद्धेचे एक लाख रुपयांचे सोन्यांचे दागिने दोन भामट्यांनी गुरुवारी लंपास केले.

Gold jewelry lamps in the name of polishing | पॉलिश करण्याच्या नावाखाली सोन्याचे दागिने लंपास

पॉलिश करण्याच्या नावाखाली सोन्याचे दागिने लंपास

Next

ठाणे : पॉलिश करून देण्याच्या नावाखाली दिडे चाळीतील एका वृद्धेचे एक लाख रुपयांचे सोन्यांचे दागिने दोन भामट्यांनी गुरुवारी लंपास केले. आंबेडकर रोडवरील दिडे चाळीत राहणाऱ्या ७३ वर्षीय वृद्धेकडे गुरुवारी दुपारी दोन अनोळखे इसम दागिने चमकवण्याची पावडर विकण्यासाठी आले. त्यांनी महिलेच्या सव्वा तोळ्याच्या चार बांगड्यांना पावडर घासली. त्यानंतर, बोलण्यात गुंतवून त्या बांगड्या एका पाण्याने भरलेल्या भांड्यात टाकल्याचे भासवले. हे भांडे गरम करण्यासाठी गॅसवर ठेवण्यास सांगून त्यांनी पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने राबोडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली. असे भामटे शहरात फिरत असल्याने पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gold jewelry lamps in the name of polishing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.