सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल आणि तीन काडतुसे हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 03:17 PM2019-04-04T15:17:23+5:302019-04-04T15:32:22+5:30

गस्ती दरम्यान पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. रवी दाढी असे या गुन्हेगाराचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल व तीन जिवंत काडतूस हस्तगत केले आहेत.

Grab a pistol and three cartridges from a practicing criminal | सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल आणि तीन काडतुसे हस्तगत

सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल आणि तीन काडतुसे हस्तगत

Next
ठळक मुद्देगस्ती दरम्यान पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे.रवी दाढी असे या गुन्हेगाराचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल व तीन जिवंत काडतूस हस्तगत केले आहेत.रवी दाढी विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

कल्याण - गस्ती दरम्यान पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. रवी दाढी असे या गुन्हेगाराचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल व तीन जिवंत काडतूस हस्तगत केले आहेत. रवी दाढी विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

कोळशेवाडी पोलिसाचे पथक गस्ती घालत असताना विजयनगर समोरील मैदानात रवी दाढी हा पिस्तूल सारखे हत्यार घेऊन गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली व. पो. नि. शाहूराज साळवे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक विलास नलावडे, पोहवा शिर्के, दहिफळे, श्रीवास, पो.ना. जमादार भोजणे, जाधव या पोलिसांच्या पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत सापळा रचत रवी दाढीला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व तीन जिवंत काडतूस हस्तगत केले आहेत. कोळसेवाडी पोलीस स्थानकात रवी विरुद्ध ६ गुन्हे दाखल असून यापैकी तीन प्रकरणात तो फरार होता. रवी या परिसरात नेमक्या कोणत्या उद्देशाने आला होता याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिली.

उल्हासनगरमध्ये एक पिस्तूल, दोन गावठी कट्टयांसह एकाला अटक

काही दिवसांपूर्वी शस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला गुरुवारी (29 मार्च) अटक केली होती. तरुणाकडून एक पिस्तूल, दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले होते. याप्रकरणी न्यायालयाने तरुणाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

उल्हासनगरमध्ये गुन्हेगारी वाढली असून एका आठवड्यात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत दोन पिस्तूल व दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत . ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी शस्त्र पकडल्याने खळबळ उडाली आहे. शहाड रेल्वे उड्डाण पूल परिसरात एक जण शस्त्र विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार तरडे यांनी उड्डाण पूल परिसरात पोलीस पथक स्थापन करून सापळा लावला. गुरुवारी (28 मार्च) दुपारी अद्दीच वाजता एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते. या संशयिताची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक पिस्तूल, दोन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसे मिळाली होती. गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला ताब्यात घेतले होते.गोविंद सिंग भदोरिया उर्फ राहुल-26 असे ताब्यात घेतलेल्या संशयित व्यक्तीचे नाव होते. 

 

Web Title: Grab a pistol and three cartridges from a practicing criminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.