अवैध दारू विक्रीची आता उभ्या - उभ्या करा तक्रार !! राज्य उत्पादन शुल्क विभागाची खास यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 01:20 PM2017-10-14T13:20:50+5:302017-10-14T13:21:30+5:30

अवैध दारू (मद्य) विक्री व्यवसाय करणाऱ्यांची आता तुमच्या मोबाईलवरून उभ्या उभ्या तक्रार करा आणि त्याच्या मनमानी त्रासावर नियंत्रण मिळवा.

Invalid liquor sale now stand - Report it !! Special machinery alert of state excise department | अवैध दारू विक्रीची आता उभ्या - उभ्या करा तक्रार !! राज्य उत्पादन शुल्क विभागाची खास यंत्रणा सतर्क

अवैध दारू विक्रीची आता उभ्या - उभ्या करा तक्रार !! राज्य उत्पादन शुल्क विभागाची खास यंत्रणा सतर्क

googlenewsNext

ठाणे - अवैध दारू (मद्य) विक्री व्यवसाय करणाऱ्यांची आता तुमच्या मोबाईलवरून उभ्या उभ्या तक्रार करा आणि त्याच्या मनमानी त्रासावर नियंत्रण मिळवा. यासाठी खुद्द राज्य उत्पादन शुल्क विभागाने खास यंत्रणा सतर्क केली.

आपल्या परिसरात, आजुबाजूला विना परवाना किंवा अवैद दारूच्या धंद्याची नागरिकाना मुक्तपणे तक्रार करता यावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १८००८३३३३३३ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.  ऐवढेच नव्हे तर सर्व प्रिय व्हॉट्सॲप देखील आता तक्रार करता येणार आहे. या करीता व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ हा आहे. ज्यांना यासंबंधीचे ईमेल पाठवायचे आहेत त्यांनी commstateexcise@gmail.com  या ई मेलवरही आपल्या तक्रारी पाठवावी. गुगल प्ले स्टोअरमधून एक्साईज कंप्लेंट ॲप डाऊनलोड करूनही नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदवता येतील.

 या तक्रारींची वेळीच दखल घेण्यासाठी विभागाचा नियंत्रण कक्ष 24x7  सुरु आहे. विभागाने स्वत:चे सुविधा पोर्टल ही विकसित केले आहे. excisesuvidha.mahaonline.gov.in  हे संकेतस्थळ असून विभागाला अवैध मद्य विक्रीसंदर्भात प्राप्त झालेल्या सर्व तक्रारी या सुविधा पोर्टलच्या माध्यमातून संबंधित जिल्ह्यांना पाठविल्या जातात. त्या तक्रारीवर कारवाई झाल्यानंतर त्यासंबंधीचा संदेश तक्रारदारास त्याच्या मोबाईलवर पाठवला जातो.  भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या वाहनांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (VTS) किटस बसवण्यात आल्या असून या वाहनांवर बारकाईने नियंत्रण ठेवले जाते.

Web Title: Invalid liquor sale now stand - Report it !! Special machinery alert of state excise department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.