कळवा रुग्णालयातील मेडिकल एप्रिल पासून बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 06:14 PM2017-10-11T18:14:07+5:302017-10-11T18:14:42+5:30
कळवा रुग्णालयातील बंद असलेले मेडिकल स्टोअर 2016 च्या सुरवातीला पुन्हा नव्याने सुरु करण्यात आले. हे मेडिकल स्टोअर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल मेडिकल स्टोअर यांना चालविण्यासाठी देण्यात आले.
ठाणे - कळवा रुग्णालयातील बंद असलेले मेडिकल स्टोअर 2016 च्या सुरवातीला पुन्हा नव्याने सुरु करण्यात आले. हे मेडिकल स्टोअर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल मेडिकल स्टोअर यांना चालविण्यासाठी देण्यात आले. पालिकेला या मेडिकल स्टोअरपोटी महिन्याला 14 लाख 10 हजार म्हणजेच वर्षाला तब्बल 1 कोटी 67 लाखांचे भाडे मिळणार होते. परंतु पहिल्याच महिन्यात या ठेकेदाराला हे भाडे भरणे शक्य नसल्याची बाब समोर आली. त्यानंतर भाडे न भरल्याने अवघ्या आठच महिन्यात हे मेडिकल सील करण्यात आले असून ते अद्यापही सुरु झालेले नाही. विशेष म्हणजे या संदर्भात लेखा परिक्षण विभागाने स्टेर्स भाड्याने देण्याच्या निविदेमध्येच अनियमितता असल्याचा ठपका ठेवला असून नोव्हेंबर 2016 पासूनची तब्बल 1 कोटी 9 लाख 45 हजारांची थकबाकी असल्याचा ठपका देखील ठेवला आहे.
आता लेखा परिक्षणाचा हा अहवाल 13 ऑक्टोबरच्या महासभेत पटलावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी या बाबत काय भूमिका घेणार हे आता पाहणे महत्वाचे ठरले आहे. कळवा हॉस्पिटलमधील आधीचे मेडिकल स्टोअर 2012 च्या सुमारास बंद झाले होते. त्यानंतर नव्याने निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदेनुसार महिनाकाठी 11 लाख भाड्याचा प्रस्ताव 9 नोव्हेंबर 2012 रोजी स्थायी समितीकडे सादर करण्यात आला होता. परंतु तो नामंजूर करुन तो फेर सादर करण्यास सांगण्यात आला. त्यानुसार हा प्रस्ताव फेर सादर करीत असतांनाच त्याचवेळेस कळवा केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट वेल्फेअर यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यामुळे ही प्रक्रिया थांबली होती. अखेर याचा निकाल लागून औषध दुकानाच्या निविदे प्रक्रियेवरील स्थगिती आदेश उठविण्यात आला. त्यानंतर पुन्हा निविदेची प्रक्रिया सुरु झाली. त्यानुसार डी.वाय. हॉस्पिटल मेडिकल स्टेाअर्सने प्रतिमहा 14 लाख 10 हजार रु पये देण्याची निविदा सादर केली होती. याच निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. एवढेच नव्हे तर संबधित मेडिकलचे चालक रु ग्णांना बारा टक्के सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करु न देणार होते. त्यानुसार त्यांना हे मेडीकल स्टोअर्स चालविण्यासाठी 2016 च्या सुरवातीला देण्यात आले.
परंतु दोन महिन्यातच या मेडीकलने पालिकेला भाडेच अदा केले नसल्याचा मुद्दा स्थायी समितीमध्ये चांगलाच गाजला होता. संबधीत संस्थेला हे भाडे भरणो शक्य नसल्याचा बाब अधोरेखीत झाली. त्यानंतर भाडे थकविण्यात आल्याने नोव्हेंबर 2016 मध्ये हे दुकान सील करुन ताब्यात घेईर्पयत ठेकेदाराकडून व्याजासह तब्बल 1 कोटी 9 लाख 45 हजार 316 रुपये एवढी थकबाकी असल्याचा ठपका लेखा परिक्षण विभागाने ठेवला आहे. ठेकेदाराने निविदा अनामत व सुरक्षा अनामतपोटी भरलेली रक्कम 47 लाख 30 हजार ही पालिकेकडे जमा आहे. त्यानुसार भाडेवसुली जप्त करुन करुन उर्वरित रक्कम वसुल करावी असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान संबधीत ठेकेदार भाडे भरत नसल्याने एप्रिल 2017 मध्ये हे मेडीकल सील करण्यात आले आहे. परंतु त्यानंतरही पालिकेने अद्यापही निविदा प्रक्रिया सुरु केलेली नसल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याची बाब नमुद करण्यात आली आहे.