ठाण्यातील संगीत कट्ट्यावर "किशोर कुमारांच्या" आठवणींना दिला उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 04:04 PM2018-08-04T16:04:19+5:302018-08-04T16:12:29+5:30
सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ठाण्यातील संगीत कट्ट्यावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे : ठाण्यातील संगीत कट्ट्यावर "सदाबहार किशोर" हा कार्यक्रम सादर झाला.यात किशोरजींनी गाऊन अजरामर केलेली गाणी सादर करत "किशोरजींचा वाढदिवस"कट्ट्याच्या कलाकारांनी उत्साहात साजरा केला.यंदाचा हा १६ क्रं चा कट्टा होता.
मेरा जीवन कोरा कागज,चेहरा हे या,हम दोनो दो प्रेमी,छुकर मेरे मन को,क्या यही प्यार है, ये राते ये मौसम,तेरे जैसा यार कहा,परदेसीया,चलते चलते हि गाणी कट्ट्याच्या कलाकारांनी सादर करताच प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. ज्ञानेश्वर मराठे,किरण म्हापसेकर,सुप्रिया पाटील,विनोद पवार,रुपाली कांबळे,प्रणव कोळी,श्रेया वरे, राजू पांचाळ,सायली अंगणे, निनाद घाग,निशा पांचाळ ,राज-कुणाल,योगेश मंडलिक या संगीत कट्ट्याच्या कलाकरांनी यावेळी गाणे गात किशोरजींच्या आठवणींना उजाळा दिला.या वेळी विजय वागळे यांनी "ये राते ये मौसम"हे गाणे शिट्टी वाजवत सादर केले.कुणाल व राज या बालकलाकारांनी छुकर मेरे मनको या गाण्याचे अप्रतिम सादरीकरण केले.या गाण्याला "वन्स मोअर"देत प्रेक्षकांनी हे गाणे पुन्हा सादर करण्याची विनंती केली. यावेळी अभिनय कट्ट्याच्या संस्कार शास्त्राच्या कलाकारांनी "चिल चिल चिल्लाके" या गाण्यावर नृत्य सादर केले.परेश दळवी या कट्ट्याच्या कलाकाराने "मै हू झुम झुम झुमरु" या गाण्यावर नृत्य सादर करत प्रेक्षकांना किशोरजींच्या काळाची आठवण करून दिली. या कार्यक्रमासाठी विणा टिळक यांनी परीक्षण केले.या प्रसंगी निवेदकांनी किशोर कुमार यांचे गाणे रेकॉर्डींग च्या दरम्यान घडलेले विनोदी किस्से सांगत कार्यक्रमात रंग भरला. दीपप्रज्वलन प्रभाकर केळकर आणि विजया केळकर यांनी केले.या कार्यक्रमात संपूर्ण व्यासपीठावर किशोरजींच्या सुंदर प्रतिमा लावण्यात आल्या होत्या.हि नेत्रदीपक सजावट पाहून आम्ही किशोरजींच्या काळात जाऊन आल्याचा भास झाला असे एका ज्येष्ठ प्रेक्षकाने सांगितले.या कार्यक्रमाचे नेपथ्य सहदेव साळकर व ओमकार मराठे यांनी केले होते. किशोरजींच्या वाढदिवसाचे निमित्त साधत आयोजक किरण नाकती यांनी या संगीत कट्ट्यापासून प्रत्येक संगीत कट्ट्यावर "व्हॉईस ऑफ संगीत कट्टा"आपण निवडणार आहोत असे घोषीत केले. व्हॉईस ऑफ संगीत कट्टा म्हणून विनोद पवार,ज्ञानेश्वर मराठे,राजू पांचाळ,यांची निवड करण्यात आली तसेच लक्ष्यवेधी म्हणून राज व कुणाल,निनाद व प्रणव या जोडीला सन्मानीत करण्यात आले.डॉ प्रभाकर केळकर व विजया केळकर यांनी गेस्ट पेरफॉमन्स मध्ये "गीत गाता हु मै" आणि "मेरी निंदो मे तुम" ही गाणी सादर केली.